Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अपंग व्यक्तींना अंतोदय अन्न योजने अंतर्गत लाभ मिळणेबाबत तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

    परतुर प्रतिनिधी

    दिनांक 15/2/2021 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन सादर करण्यात आले विषय परतुर तालुक्यातील अपंग व्यक्तींना अंतोदय अन्न योजने अंतर्गत लाभ मिळणेबाबत दिनांक 17 जुलै 2013 च्या शासन निर्णयानुसार अपंग व्यक्तींना अंतोदय योजनेमध्ये समावेश केलेला असून सदरील अपंग साहित्य वाटप करावे असा शासन निर्णय पारित झालेला आहे त्यानुसार परतुर तालुक्यातील सर्व अपंग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा व तशा सूचना तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना देण्यात यावा 

     तसेच सदरील अपंग लाभार्थ्यांना अंतोदय योजनेचे शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना सादर करण्यात आले माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करताना प्रवीण रघुनाथ ढवळे तालुका अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य परतुर तालुका उपाध्यक्ष आसाराम सूर्यभान आबुज परतुर तालुका सचिव आकाश वामन सोळंके परतुर तालुका सहसचिव श्याम अच्युत सोळंके यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना अपंगांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले माननीय तहसीलदार साहेब यांनी लवकरच अपंगांच्या विविध मागण्या मान्य करू असे आश्वासन अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांना दिले