प्रतिनिधी एरंडोल गणेश महाजन
एरंडोल येथील बासरी वादक योगेश पाटील हे तळागाळातील लोकां पर्यंत बासरी वाजनाचे काम ते गेल्या वर्षांपासून ते करत आहेत.त्यात कोरोना सारखी महामारी अत्यंत भयानक आहे आणि अश्या परिस्थिती मधे मानसिक संतुलन बिघडते त्यासाठी संगीत व योगा अश्या गोष्टी तारक ठरतात.मग बासरी मना वरचा तान कमी करते.बासरी सूशिर वाद्य असल्यामुळे प्राणायाम चे काम करते.मुळात समस्या खुप आहेत.त्यात हा बांबूचा तुकडा काय करणार असे अनेक विचार सहज येतील.खर आहे बासरी वाजुन कोविड रुग्ण दुरुस्त होण अशक्य आहे.पण मनाला ताकत देण्याच काम बासरी नक्कीच करेल यात शंकाच नाही . सकारात्मक विचार मनात आणणारे अनेक मार्ग नक्कीच आहेत जसे अध्यात्म , योगा , संगीत.तिघांची जोड झाली तर ऊत्तमच.आपण नेहमी वाचतो कि संगीत ऐकाव मग नक्की काय ऐकाव ? कस ऐकाव ? याची जाणीव आपणास नसते .
ऊत्तम संगीत तेच ( आरोग्यासाठी ) जे आपल्या डोळ्यासमोर सुरु आहे आणि जिवंत आहे .अस संगीत सर्वोत्तमच.रेकॉर्डट तर आहेच आपल्या हातात पण जिवंत संगीत हे वलय निर्माण करतात आणि बासरी वरचा तो मंद्र पंचम आपल शरिर कंपन करतो . त्यातच राग मालकंस , भुपाली , दुर्गा हे वाजवले किंवा ऐकले जरी तरी आत्मबल वाढायला मदत होते.आपल्याला पुर्ण श्वास घेण्याची सवय लागते.त्यामुळे फुफ्फुसे बळकट होतात . लाँगनोट्स सारखा प्रकार अत्यंत गुणकारी आहे,यात पुर्ण श्वसन करुन एकच स्वर बरेच सेकंद लावला जातो.आणि हे करत असताना मन स्थिर होते आणि हळु हळू छान वाटायला लागलं . किंवा तुम्हाला जि पण वाद्य आवडतात ती शिकत रहा मग सनई,ट्रंपेट,माऊथ अॅर्गन ई . हे शिका.आणि भविष्यात एक तरी ललित कला जोपासा असे प्रतिपादन योगेश पाटील यांनी केले आहे.
योगेश पाटील यांची गुरू परंपरा पद्मविभूषण पं.हरिप्रसाद चौरसिया यांचे जेष्ठ शिष्य खांदेरत्न पं.विषेक सोनार हे योगेश पाटील यांचे गुरू आहेत . त्यांच्याच आदेशावरून कार्य सरू आहे.बासरी वादन मोफत शिबिर हे ३ मे २०२१ ते ३ जुन २०२१ पर्यंत चालणार आहे.दररोज सकाळी एक तास झूम अप वर असणार आहे.त्या साठी योगेश पाटील यांना व्हॉट्स ॲप मार्फत संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
