प्रतिनिधी प्रतिनिधि जितेश कारीया
हिवरखेड हे शहर जवळपास ५० हजार लोकवस्तीचे शहर असून लोकसंख्येच्या तुलनेत येथे कोविड३० च्या जवळपास पोसिटीव्ह रुग्णांची संख्या नगण्य आहे त्याच तुलनेत तेल्हारा व अकोट सारखी शहरे प्रतिबंधक क्षेत्राच्या बाहेर असून त्याठिकाणी लॉकडाऊन च्या नियमावली प्रमाणे व्यवसाय सुरू आहेत.
येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर लॉकडाऊन मुळे उपासमारीची पाळी आली आहे गडी माणसांचे पगार, इलेक्ट्रिसिटी बिल, यासारखे खर्च कोठून करावे हा प्रश्न व्यवसाईकांना पडला आहे.
भाजी वाले, सलून व्यावसायिक, झेरॉक्स सेंटर, पाणीपुरी वाले,छोटे किराणा व्यावसायिक, फळ फ्रुट विक्रेते, थंड पेय विक्रेते, यासारख्या अनेक छोट्या मोठ्या व्यवसाईकांवर उपासमारीची पाळी आली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून हिवरखेड पूर्णपणे लॉकडाऊन आहे. तर मागील वर्षीपासून लॉकडाऊन मुळे व्यावसायिकांचे कंबरडेच मुळले आहे म्हणून तेल्हारा, अकोट सारखेच हिवरखेड शहर सुद्धा कंटेन्मेंट झोनच्या बाहेर काढून छोट्या मोठ्या व्यवसाईकांना दिलासा द्यावा अश्या आशयाचे निवेदन हिवरखेड पोलीस स्टेशन, तहसिलदार तेल्हारा यांना व्यापारी , मजूर ,प्रतिष्ठीत नागरिक , व अखिल भारतीय पत्रकार संघ,आणि आदर्श पत्रकार संघ यांच्या उपस्थितीत सोशलडिस्टिंग चे पालन करून देण्यात आले आहे.
