प्रतिनिधी देऊळगाव राजा
दि .26 मे 2021 रोजी सम्पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनिक सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध यांच्या 2565 व्या " जयंतीदिनानिमित्ताने " बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव दौलतराव जाधव यांचे निवासस्थानी छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले . तद्नंतर डॉ .बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून दीप प्रज्वलित करून अगरबत्ती व धूप यांनी पूजन करण्यात आले .त्यानंतर त्रिशरन व पंचशील ग्रहण करण्यात आले .
सदर कार्यक्रमास जनार्दनभाऊ चोपडे ,सावजीभाऊ जाधव ,अंकुशराव देशमुख ,आत्माराम पनाड ,सौ .पार्वताबाई पनाड ,सौ वैशालीताई सुनील जाधव ,सौ .आम्रपाली आनंद चाबूकस्वार ,सौ .ज्योतीताई दिलीपराव जाधव इत्यादि उपस्थित होते . तसेच खीरदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन कु. देवश्री दिलीपराव जाधव व चि .दीपरत्न दिलीपराव जाधव यांनी केले होते .
