मलकापूर प्रतिनिधी
कोरोना महामारी ने सर्वत्र हाहाकार झालेला आहे त्यातच कोरोना उपचार घेताना रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातून बरे झाल्यानंतर ब्लॅक फंगुस, व्हाईट फंगस, म्युकर मायक्रो सिस अशा गंभीर आजारांमुळे तर समस्यांमध्ये आणखीनच भर पडलेली आहे व आता तर या आजाराने लहान मुले ही संक्रर्मित होत आहे अशावेळी रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना मनात अनेक प्रश्न किंवा समस्या उद्भवतात तेव्हा त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व्हावे याकरिता शहरातील विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दल तर्फे मोफत कोवीड पोस्ट/ कोवीड व्हर्च्युअल पद्धतीने जनहितार्थ मार्गदर्शनाची सुविधा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उपलब्ध करण्यात आलेले आहे.या व्हर्च्युअल मार्गदर्शन सेवेचे आज उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली.
आज कोरोना या आजाराने संपूर्ण जगात थैमान घातलेले आहे त्यातून मुक्तता होत नाही तर ब्लॅक हंग अस व्हाईट फंगस न्यू कर मायक्रो सिस या गंभीर आजाराचे प्रकार सुद्धा समोर येत आहेत अशा परिस्थितीत रुग्ण व त्याचे नातेवाईकांमध्ये विविध संभ्रम निर्माण झालेले आहेत त्याच बरोबर लहान मुलांना सुद्धा कोरोना या विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता बळावली आहे अशा परिस्थितीत समाजसेवेत नेहमीच सक्रिय असणारे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यामार्फत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनात मोफत कोविंड/ पोस्ट कोविंड व्हर्च्युअल मार्गदर्शन सेवा या प्रकार सुरू करण्यात आले त्याचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर वी. दा.सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुगल मीट च्या साह्याने आज सकाळी आठ वाजता करण्यात आले.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून नगर संघचालक दामोदर लखानी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. आमदार चैनसुख संचेती, तर प्रमुख उपस्थिती म्हणून विदर्भ प्रांत बजरंग दल संयोजक एड अमोल अंधारे हे लाभले. ही व्हर्च्युअल सेवा ही गुगल मीट एप्लिकेशन द्वारे दर बुधवार व रविवार या दिवशी दुपारी चार ते चार वाजून चाळीस मिनिट पर्यंत रुग्णाचे प्रश्न व तज्ञ डॉक्टर याच्या माध्यमातून मोफत मागदर्शन देण्या करिता डॉ. रुपेश वर्मा(कोविड तज्ञ/फिजिशियन), डॉ. भावना पाटील(कान नाक घसा तज्ञ),डॉ. योगेश पटणी(होमियोपॅथीक / लसीकरण),डॉ. रिया चोपडे (बालरोग तज्ञ),डॉ. मितेश टावरी (बालरोग तज्ञ),डॉ. सुवर्णा खंगार (आयुर्वेदिक व स्त्रीरोग तज्ञ),डॉ. माधुरी हागे (जनरल फिजीशियन),डॉ. श्रेयस व्यवहारे (दंत व मुखरोग तज्ञ), डॉ. विनोद हागे (शल्य चिकित्सक),डॉ. अमित चौधरी(आयुर्वेदिक तज्ञ),डॉ. नरेंद्र सुपे(दंत व मुख रोग तज्ञ),डॉ. आरती तायडे (होमियोपॅथिक व स्त्रीरोग तज्ञ),या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन राहणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.हि.प.सत्संग प्रखंड प्रमुख ह.भ.प.शिरीष घिर्णिकर महाराज यांनी केले. तर प्रास्ताविक बजरंग दल प्रखंड संयोजक दीपक कपले यांनी केल. आभार प्रदर्शन विश्व हिंदू परिषद जिल्हा सह मंत्री श्रीकृष्ण तायडे यांनी केले.
