Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जुन्या वादातुन एकमेकांच्या मोटरसायकली जाळल्या

Responsive Ad Here

 प्रदिप रघुते प्रतिनिधी अमरावती       

        हिंगणघाट :-येथिल मोटरसायकल जाळल्याच्या संशयावरुन परिसरातच रहात असलेल्या मोटरसायकलस्वारांवरती हल्ला करुन त्यांची मोटरसायकल जाळल्याची घटना काल स्थानिक शास्त्री वार्ड येथे घडली.   याचवेळी फिर्यादीने सुद्धा याआधी आरोपीची मोटरसायकल जाळली यावरून त्याला अटक झाली होती  या प्रकरणात गुंतागुंत निर्माण झाली आहे.

          प्राप्त माहितीनुसार,काल दि.18 रोजी फिर्यादि पीयुष सुनील लोणारे आपल्या मित्रासह सायंकाळी 7 वाजताचे दरम्यान आरोपी देवराव पुरके रा.शास्त्री वार्ड यांचे घरापासून पल्सर मोटरसायकल क्र.एमएच-32 एटी - 6920 ने जात असता परिवारातील बाप-लेकांनी तसेच बहिनीने "आमची मोटरसायकल तुच जाळली" म्हणत चाकू,कुराडीने जीवघेणा हल्ला केला.

      या दरम्यान फिर्यादिने आपली मोटरसायकल तेथेच सोडून पळ काढला.परंतु त्याचा मित्र अमित राऊत याला मारहाण करीत फिर्यादिची मोटरसायकल आरोपी देवराव पुरके, सचिन पुरके, सारिका मंडाळे यांनी पेट्रोल टाकून जाळली. आरोपींविरोधात कलम 307, 324, 435, 294, 427, 506 188- 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर फिर्यादी सौ लक्ष्मी देवराव पुरके हिच्या तक्रारीवरून आरोपी पियुष लोणारे, अमित राऊत यांचे विरोधात कलम 326, 506, 188- 34 नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटणकर करीत आहे.