पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदूर रेल्वे
चांदुर रेल्वे तालुक्यातील नामांकित ग्रामपंचायत पळसखेड येथे आज गुरुवार दिनांक 20 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेड येथे 45 च्या वर वयोगटातील लोकांना लस देणे चालू असून तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे आज प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेड येथे एकूण 40 लस उपलब्ध
होती पण लोकांची सकाळी 6 वाजता पासून लाईन लागल्या मुळे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे येथे लाईन मध्ये उभे राहणाऱ्या लोकांना टोकण न देऊन ओळखीच्या लोकांना 5 ते 6 आधारकार्ड घेऊन टोकण देत असल्याची चर्चा लोकान मध्ये होत आहे .तरी सर्व लोकांना लस मिळेल असे प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेड व ग्रामपंचायत पळसखेड मार्फत सांगण्यात येत आहे.
