Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या - धनश्रीताई काटीकर पाटील

Responsive Ad Here

प्रतिनिधी बुलढाणा 

                 लॉकडाऊन मध्ये निर्माण झालेलि आर्थिक टंचाई लक्षात घेता शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते तसेच कीटनाशके मोफत पुरवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना  तहसीलदार मलकापूर  यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली.  मागील वर्षापासून चालू असलेल्या कोरोना महामारी च्या काळात संपूर्ण  जग लॉक डाऊन असल्यामुळे आधीच आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या शेतकरी वर्गाला आपल्या मालाला बाजारपेठेत येऊ न शकल्यामुळे, भाव न मिळाल्यामुळे तसेच माल नाशवंत असल्यामुळे आर्थिक फटका बसलेला आहे. अस्मानी-सुलतानी संकट व लॉकडाऊन  मुळे  शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

        त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोफत बी-बीयाणे शेती व कीटकनाशक औषधाचा पुरवठा करून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आणेवारी 50 पैशाच्या आत आली आहे  . कोरोना महामारी मुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये  लॉकडाऊन करण्यात आला आहे. याचा परिणाम समाजातील अनेक घटकांवर झाला आहे. तर लॉकडाऊन मुळे शेती मालाला उठाव नसल्यामुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे बँकांमार्फत करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून पैशाअभावी शेतकऱ्यांना बी-बियाणे खते व कीटकनाशके आवश्यक शेती अवजारे खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना मोफत बी-बियाणे खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून देण्यात यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. 
                     सदर निवेदन वर धनश्री ताई काटेकर पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, प्राध्यापक प्रकाश थाटे, करणसिंह सिरसवाल, सय्यद ताहेर , संतोष वानखेडे, रोशन वाकोडे , अनंता दिवनाले, राहुल खोंदले , गोविंद वानखेडे,  विलास हिवाळे, इलियास खान पठाण, ख्वाजा कुरेशी इत्यादी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.