Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर धडक कारवाई मालखेड गावात 2 दिवसात तब्बल 15 हजारांचा दंड वसूल

Responsive Ad Here

 पियुष ठोंबरे चांदूर प्रतिनिधी


 तालुक्यातील पहिल्या  अंगणवाडी सेविका कोरोना समितीच्या अध्यक्षपदी स्थानिक कोरोना नियंत्रण व उपाययोजना समितीची कौतुकास्पद कारवाई 


  चांदुर रेल्वे :-  'ब्रेक द चेन' या अंतर्गत संचारबंदीतील निर्बंध आणखी कडक करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून दिलेल्या निर्देशानुसार मालखेड रेल्वे ग्रामपंचायत परिसरात कोरोना नियंत्रण व उपाययोजना समितीची बैठक घेण्यात आली गावाप्रति असलेली आस्था आणि कार्यशैली बघता गाव कोरोना मुक्त करण्यास सक्षम म्हणून गावातील अंगणवाडी सेविका सुषमाताई चौकडे यांची सर्वानुमते कोरोना नियंत्रण व 

  उपाययोजना समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली अध्यक्ष बनताच पहिल्याच दिवशी गावात फिरून उपाययोजना संदर्भात जनजागृती करण्यात आली शिवाय नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे यावेळी सकाळी  11. 58 ला गावातील मुख्य चौकात असलेली  दूध डेअरी सुरू आढळली त्यामुळे डेअरी मालकास पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे तसेच मालखेड येथील देशी दारू चे 2 दुकाने असून या दोन्ही दुकानांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड दुकानाच्या बाहेर बॉक्समध्ये दारू चे बाटल्या ठेवून जागेवर विक्री केल्यामुळे दिला आहे असा एकूण 15 हजारांचा दंड स्थानिक प्रशासनातर्फे वसूल करण्यात आला आहे 

    यावेळी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी एस.जे. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी संजय चौधरी,तलाठी प्रफुल्ल गेडाम कोरोना समिती अध्यक्ष सुषमा चौकडे सरपंच लताताई डोक, उपसरपंच गोपाल अळने,ग्राम पंचायत सदस्य अनिल सोनटक्के,लता पाटील,विनोद निचत,नामदेव मारोटकर, शुभम पोकळे,पोलीस पाटील मेघा विलास मोहोरे, व ग्राम पंचायत चे पदाधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. "यापुढे प्रशासनाने दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची हयगय केल्या जाणार नाही देशात कोरोना महामारी ने थैमान घातले असून घरे च्या घरे उध्वस्त होत आहे आतापर्यंत लाखो लोकांनी या रोगांमुळे आपला जीव गमावला आहे त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी लक्षात घेता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे"

सुषमाताई चौकडे

अध्यक्ष, कोरोना नियंत्रण व उपाययोजना समिती,मालखेड रेल्वे