Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोना परिस्थिती बघता 24तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा याबाबत तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

 पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे

     अल्पवधित पावसाळा सुरु होणार असून अनेक गावांत होमआसोलेशन मध्ये कोरोना पेशंट आहेत त्याचा साठी चोविस तास विद्यूत पुरवठा अखंड चालू असणे आवश्यक आहे करीत मालखेड सब स्टेशण फिडर वरून होणारा विद्यूत पुरवठा अखंडीत करावा किंवा चांदुर रेल्वे फिडर वरून विद्यूत पुरवठा करावा अशी मागणी मा,ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना तहसीलदार यांचे मार्फत दिलेल्या निवेदनातुन केली आहे पळसखेड,सोनोरा भिलटेक ,सावंगी संगम ,या गावांना विद्यूत पुरवठा मालखेड सब स्टेशन फिडर वरून होतो परंतु हा विद्यूत पुरवठा बरेचदा खंडित होतो.


    वादळी पाऊस वारा सुटला कि खंडीत झालेला विद्यूत पुरवठा दोन दोन दिवस सुरु केल्या जात नाही त्यामुळे वरील गावातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो गेल्या दोन वर्षा पासून हा प्रकार सुरू आहे याबाबत महावितरण कंपिणीच्या अधिकाऱ्यांना अवगत करून ही ते तक्रारीकडे दुर्लक्ष करतात व मूळ समस्या तशिच राहते हि गंबीर बाब लक्षात घेऊन चांदुर रेल्वे फिडर वरून विद्यूत पुरवठा करावा अशी मागणी मा,ऊर्जा मंत्री नितीन राऊत याना तहसीलदार यांचा मार्फत दिलेल्या निवेदना मार्फत केली आहे .

    निवेदन देते वेळी पळसखेड च्या सरपंच सौ, भारती पारधी उपसरपंच अमोल अडसड ,सदशय वर्षा ताई देशमुख , रवींद्र उपाध्ये ,किशोर राऊत, प्रिया पिंजरकर, लक्ष्मण गायनर, सोनोरा च्या सरपंच सौ कविता ताई खडसे , उपसरपंच श्री प्रवीण पाटील जुनघरे , ग्रामपंचायत सदशय श्री सूरज मेश्राम, श्री जितेंद्र ठोंबरे, भिलटेक चे सरपंच श्री मनोज राऊत , सागर चौधरी, अंकुश ठोंबरे, सावंगी संगम चे सरपंच सौ, सारिका सुनीलराव राऊत उपस्थित होते