Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वडद येथे आठ वर्षा नंतर १०५ शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा.शेवटी न्याय झाला

Responsive Ad Here

औंढा नागनाथ  प्रतिनिधी

तालुक्यातील वडद गावामध्ये वडद - सिरला शिव रस्त्यावरील  मागील आठ वर्षांपासून अतिक्रमण होते आणि 105 शेतकऱ्यांचा दळण वळणाचा मार्ग बंद होता, मागील आठ वर्षानंतर  दि:03/04/2021वार गुरुवार रोजी अतिक्रमण हटवण्यात आले आणि शिव रस्ता मार्ग मोकळा केला यावेळी औंढा नागनाथ तालुक्याचे तहसीलदार मा.श्री.कानगुले साहेब, नायब तहसीलदार मा.श्री., भालेराव साहेब, मंडळ अधिकारी मा.श्री.घुगे साहेब, तलाठी सौ.सिरसाट मॅडम,  हट्टा पोलीस स्टेशनचे स.पो.नि.मा.श्री.मोरे साहेब व त्यांची इतर पोलीस फोर्स यांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून कोणावरही अन्याय न होता संबंधित पुराव्यावरून अतिक्रमण हटवले .

    हा मार्ग आठ वर्षापासून बंद असल्यामुळे सर्व शेतकरी परेशान,हतबल झाले होते दळणवळनाचा दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने पावसात ,चिखलात, उभ्या पिकातून डोक्यावर माल न्यावा लागत होता, शेतकरी तसेच त्यांचा पूर्ण परिवार या अडचणीला तोंड देत होता. हे सर्व अनेक वेळा त्यांनी सरपंच, तलाठी, पूर्वीचे तहसीलदार माचेवाड साहेब यांच्याशी अनेक वेळा भेट देऊन हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली परंतु आज पर्यंत हा प्रश्न सुटला नव्हता.  शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे वाटत नाही म्हणून निराश झाले होते .तेव्हा अशातच देवकृपेने तहसीलदार रूपाने मा.श्री.कानगुले साहेब आम्हाला लाभले आणि त्यांनी 105 शेतकऱ्यांची आठ वर्षापासून ची अडचण बघून हा प्रश्न योग्य पध्दतीने निकाली लावला. 

   त्याबद्दल  वडद,सिरला आणि रांजाळा असे सर्व शेतकरी मिळून तहसीलदार साहेबांचे व इतर सर्व सरकारी अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आहोत असे शेतकरी म्हणाले. अप्पाराव नेव्हल ,गंगाधर नेव्हळ, राधेशाम जैस्वाल शितल लाल जैस्वाल, श्रीधर नेव्हल, बळीराम सोनवणे, नारायण सोनवणे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.तसेच वडद चे तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब नेव्हल, सरपंच लक्ष्मण वाटोडे, पोलीस पाटील रणवीर पणं उपस्तीत होते.