Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अनेक शासकीय कार्यालय राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचे विसरले-धिरज भुमरे

Responsive Ad Here

 औंढा नागनाथ प्रतिनिधी

    राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वि जयंती 31 मे रोजी होती ,परंतु आम्ही याची चौकशी केली असता अनेक ग्रामपंचायत कार्यालयात व शासकीय कार्यालयात ही जयंती साजरी झाली नसल्याचा गंभीर आरोप मल्हार महासंघ महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा प्रमुख धिरज शिवाजीराव भुंमरे यांनी केला आहे.यासंदर्भात एक जाहीर पत्रक काढून संबंधित कार्यालयावर कारवाई करावी अशी मागणी मल्हार महासंघाचे जिल्हा प्रमुख धिरज भुंमरे यांनी केली आहे.

    यावेळी धिरज भुंमरे असे म्हणाले की जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन प्रस्तुत करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अनेक शासकीय कार्यालयामध्ये साजरी झाली नाही शासन निर्णय सा. प्र. विभाग क्र. ज.पु.२०२०प्र. क्र.९५/२९ दिनांक १४ जानेवारी २०२१ चे परिशिष्ठ(सुधारित) २१ नुसार सर्व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करणे बंधनकारक आहे.

असे असताना सुद्धा काही शासकीय कार्यालयात जयंती साजरी न झाल्यामुळे समाज बांधवांच्या मोठ्या प्रमाणात सामाजिक भावना दुखावल्या आहे.म्हणून शासकीय कार्यालयात का जयंती साजरी करण्यात आली नाही याबाबत खुलासा मागून व ज्या कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली नाही त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा व आजपासून ज्या कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा अद्याप ठेवली नाही त्या कार्यालयाला एक नोटीस द्या अशी मागणी संबधित पुराव्यावरून धिरज शिवाजीराव भुंमरे यांनी केली आहे.