संजय पवार अमरावती प्रतिनिधी
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा धानोरा गुरव या गावामध्ये अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा ग्रामपंचायत मध्ये मोठा उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी ग्रामपंचायत मध्ये गुढी उभारून स्वराज्याचे तोरण बांधण्यात आले होते यावेळेस गावाचे सरपंच अश्विनी शेंद्रे उपसरपंच प्रमोद कोहळे ग्रामसेवक खंडारे साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले .
भगवी गुढी उभारण्यात आली तसेच ग्रामपंचायत सदस्य पत्रकार नितीन जाधव कपिल साबळे प्रतीक्षा ताई गावातील प्रतिष्ठित नागरिक शरद राव गुंजाळ सुधाकर राव जाधव आकाराम जी इंगळे चंदू दिघे सुरज सिंग कदम सचिन जाधव सरदार सिंग जाधव रतनसिंग बाजहीरे बबन राव धानोरकर अशोकराव खंडागळे व शिपाई गोविंदराव कथलकर यांनीसुद्धा प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
