देऊळगाव राजा प्रतिनिधी भिमराव चाटे
मूलभूत सुविधा मिळण्यासाठी सैनिक कॉलनीतील नागरिक परेशान देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी परिसर चिखली रोड देऊळगाव राजा पेट्रोल पंप समोरील शिवशंकर नगर हायवेला लागूनच आहे येथे जास्तीत जास्त सैनिक परिवार व नोकरी वर्गातील लोक राहतात मूलभूत सुविधा मागण्यासाठी ग्रामपंचायत कडे गेले तर ग्रामपंचायत म्हणजे तुमचे मतदान येथे नाही जास्त करून सैनिक या कॉलनी मध्ये असल्यामुळे ते देशातल्या कानाकोपऱ्यात ड्युटीवर राहतात देश सीमेवर ड्युटी करणारे सैनिक मतदान कार्ड राशन कार्ड याकडे फारसे लक्ष देत नाहीत कारण त्यांचे मतदान प्रॉक्सी वोट म्हणून आपल्या आपल्या गावातून बॅलेट पेपर सीमेवर युनिटमध्ये येतात सैनिकांच्या सैनिक पत्नी शहरांमध्ये घेतलेल्या घरामध्ये मुलाबाळांना शिकवण्यासाठी राहतात त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत रस्त्यावरील पथदिवे नाहीत रस्त्याच्या कडेला नाल्या नाहीत व नळ योजनेचा सुद्धा अजून कोसोदूर कुठे नाव पत्ता नाही ग्रामसेवक म्हणतात तुम्ही जे प्लॉट घेतलेले आहेत ते लेआऊट झालेले प्लॉट आहेत त्याअर्थी त्या प्लॉटिंग मधे खोलीला रस्ते वीज पथदिवे नाल्या सुविधा लेआऊट धारक
मालका कडूनच मिळायला हव्यात या एका कॉलनीत तीन चार लेआउट धारकांनी दहा पंधरा वीस वर्षांपूर्वी लेआउट केलेले आहे एक प्लॉट पंधरा लाख ते तीस लाखापर्यंत चे किंमत परंतु सुविधा कवडी मात्र ची नाही कॉलनीमध्ये हवा फक्त नैसर्गिक आहे बाकी सर्व गोष्टीला पैसे मोजावे घर फ्लॅट रो हाऊसेस बनल्यानंतर टॉयलेट बाथरूम चे पाणी डोंगरा कडील बाजू चे खालच्या बाजूकडे लोकांच्या घरासमोरून विदाऊट ड्रेनेज रस्त्यावर व्हायला लागते तेव्हा आपसात वाद होऊन कलह निर्माण होतात तेव्हा नाल्या पथदिवे रस्ते बनलेले नाही.
नळ कनेक्शन नाही जमिनीतही पाणी नाही 400 फूट बोर सुद्धा कोरडे मग शासन लाखो रुपये टॅक्स घेऊन बांधकाम टॅक्स घेऊन करते तरी काय आणि सुविधा देणार तरी कधी या प्रतीक्षेत आहे शिवशंकर नगर सैनिक कॉलनी तले लोक आक्रोश करीत आहेत लेआउट धारक फक्त प्लॉट विक्री करण्यामध्ये व्यस्त आहेत लेआउट धारकांनी ओपन स्पेस मध्ये सुद्धा छोटे छोटे प्लॉट करून ते कमी किमतीमध्ये विकत आहे त्यांच्याकडे ओरिजनल डुबलीकेट दोन दोन नकाशे आहेत कोणत्याही नकाशाचा कोणालाही ताळमेळ लागत नाही एवढी महागडी कॉलनी असून या लेआउट चे सांडपाणी पाणी त्या लेआउट मध्ये विना नाल्याच्या रस्त्यावर वाहते प्लॉट लेआउट धारकांच्या व्यतिरिक्त सैनिक कॉलनीतील नागरिकांनी लोकवर्गणी करून ड्रेनेज साठी लाखभर रुपयाचे पाईप आणले सुद्धा तरीपण ग्रामपंचायत कडून काहीही मदत मिळायला तयार नाही ग्रामपंचायत खांबावर एक पथ दिवा एलईडी लाईट सुद्धा लावू शकत नाही म्हणतात की तुमचे मतदान इथे नसल्यामुळे तुमच्यावर खर्च करण्यासाठी परवानगी मिळत नाही ग्रामपंचायत ने जर हायवे लगतच्या सर्विस रोड ला पेट्रोल पंपा पासून बायपास पर्यंत चे नाली बांधकाम पूर्ण केले तर लोकवर्गणीतून आणलेले पाईप त्या मुख्य नालीमध्ये सोडण्यास सर्व कॉलनीतील नागरिक तयार आहेत पावसाळ्याची सुरुवात होऊन वाद वाढण्यापेक्षा शासन आणि प्रशासनाने यावर लवकरात लवकर लक्ष दिले तर सर्वांसाठी सोयीचे होईल देऊळगाव राज्यातील ही शिवशंकर नगर सैनिक कॉलनी खूप महागडी असली तरी शांत प्रिय आणि चांगले वातावरणाची आहे भविष्यातही नगरपालिकेत मोडण्यात येत आहे परंतु आज मात्र सुविधांच्या बाबतीत या कॉलनी सावत्र व्यवहार होत आहे सैनिक सीमेवर ड्युटी करतो कधीही कुणाची सावत्र व्यवहार करत नाही वसुधैव कुटुम्बकम हे विश्वची माझे घर या प्रमाणे राहतो व रक्षण करतो परंतु त्यांच्या परिवारातील सदस्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायत दोन्ही मिळून असमर्थ आहेत याचा खेद वाटतो .
कधीकधी नगरपालिकेच्या अधिकार्यांना दया येते तेव्हा मात्र कचरा घेण्यासाठी घंटागाडी कॉलनी मध्ये निशुल्क येते तेवढे सुविधा मिळते अन्यत्र सर्व सुविधा पासून ही सैनिक कॉलनी दूर आहे यावर शासन आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे
