संजय पवार अमरावती प्रतिनिधी
आज दि, 6 जून रोजी क्षत्रिय मराठा संघटनेकडून अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने सर्वप्रथम महाराजांच्या पुतळ्याला दूध दही व शुद्ध जल याद्वारे अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर भव्य दिव्य हार अर्पण करून पूजन करण्यात आले व समस्त शिवप्रेमींना मिठाईचे वाटप करण्यात आले आजच्या या पावन दिनाच्या निमित्ताने अमरावती शहर व जिल्हा मराठा संघटना यांच्या वतीने गोरगरीब जनतेला एक हात
मदतीचा म्हणून मराठा समाज संघटना पुढे आली. क्षत्रिय मराठा संघटनेची अमरावती टीम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने गोरगरीब जनतेला त्यांना आवश्यक असणाऱ्या धान्याचा वाटप करण्यात आला आहे त्या वेळेस उपस्थित स्थानीय नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी क्षत्रिय मराठा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश व शहर व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
शहर अध्यक्ष, संदीप बेहरे जिल्हा अध्यक्ष, योगेश भोसले महाराष्ट्र कार्यकारणी,गौरवजी पवार महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमण पाटील महाराष्ट्र क्रीडा प्रमुख समीर देशमुख शहर उपप्रमख श्रीकांत जाधव उपशहर प्रमुख योगेश वानखडे महिला संपर्क प्रमुख उत्तराताई देशमुख विदर्भ क्रीडा प्रमुख नरेंद्रभाऊ गाडे वारकरी संप्रदाय जिल्हाप्रमुख अमोल साखरे अमरावती तालुक्का प्रमुख अमर उमक जगदंब ग्रुप सचिव अजय बेहरे हिरदेलाल,बाबरदादा, महिला जिल्हा अध्यक्ष जायाताई बद्रे महिला शहर प्रमुख रजनीताई घरडे महिला जिल्हा दक्षता संगीता ताई गायकवाड महिला जिल्हा सचिव कांता ताई काळेमहिला जिल्हा उपप्रमुख कल्पना ताई परतेकी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला

