Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वायकोळे परीवाराकडुन दोन्ही दिव्यांग कुटुंबांना किराणा किट देऊन दिला मदतीचा हात

Responsive Ad Here

मलकापुर प्रतिनिधी

   शहरामधील आपल्या कुटुंबा सोबत राहणारे दिव्यांग बांधव विजय रामचरण आठवले यांच्यावर खुप वाईट प्रसंग आला असुन मागील महिण्यात त्यांच्या 22 वर्षीय मुलाचे अल्पशा आजाराने निधन झाले होते  मुलाचे जाण्याचे दुख व कोरोना लाँकङाऊन मुळे कामधंदा नसल्यामुळे बिकट परीस्थिती असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे पारपेठ मधील अपंग बांधव शेख आसिफ शेख अजीज व त्याची पत्नी अमीना बी शेख आसिफ ही मूकबधिर आहे त्यांची छोटीसी सायकल दुरुस्तीची दुकान असुन लॉकडाऊन मुळे दुकान बंद असल्यामुळे त्याच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.

   याची माहिती गरीब,गरजु,निराधार यांना फुल न फुलाची पाकडी कोणाच्यातरी सहकार्यांतुन होत राहो अश्या मदतीच्या सेवेसाठी असणारे अमोल बावस्कार यांना निलेश चोपडे दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन चे अध्यक्ष यांच्या माध्यमातून कळताच अकोला येथील सतत गरजुंच्या सुखावदुखात सहभागी राहणारे नीता यशवंत वायकोळे,यशवंत बाबुराव वायकोळ यांच्या कडुन च्या दोन्ही दिव्यांग कुटूंबीयांना किराणा किट देेऊन मदतीचा हात देण्यात आला. यावेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन अध्यक्ष निलेश चोपडे,सचिव इलियास खान,माणुसकी फाऊंडेशन चे कोषध्यक्ष मंगेश देशपांडे हे उपस्थित होते.

   ज्या भागात दिव्यांग, निराधार,गरजु परिवार आहेत त्याच्या पर्यंत आम्ही मदत पोहचत आहोत असे दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन अध्यक्ष निलेश चोपडे यांनी कळविले.तर सद्या सर्वञ लाँकडाऊन आहे बऱ्याच कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

अश्या गरजु,गरीब परीवारातील कुटुंबासाठी मदत करावी आपण जिथे कुठे आहात,तिथुन कोणत्या तरी गरीबाच्या चेहऱ्यावर  आपल्या मुळे आनंद बघता येऊ शकतो अशी विनंती अमोल बावस्कार यांनी केली आहे.