हिवरखेड प्रतिनिधी:- जितेश कारीया
पोलीस स्टेशन आणि पत्रकार संघाचा पुढाकार
हिवरखेड येथील आदर्श आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना व हिवरखेड पोलीस स्टेशनच्या वतीने कोरोना काळ लक्षात घेऊन साध्या पद्धतीने ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. आणि त्यांच्या दानशूर प्रवृत्ती आणि त्यागीवृत्ती बद्दल माहिती विशद केली. सर्व उपस्थितांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हारार्पण आणि पूजन केले.
यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठानेदार धीरज चव्हाण उपनिरीक्षक गोपाल दातीर, विठ्ठल वाणी, सर्व पोलीस बांधव तसेच आदर्श आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राजेश पांडव, संदिप इंगळे, धीरज बजाज, अनिल कवळकार, जितेश कारिया, सूरज चौबे, अर्जुन खिरोडकार इत्यादी पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्याम कोल्हे, श्रीकृष्ण वैतकार, संतोष बाजोड, आनंद होपळ, सुरेश भोंडे, अक्षय काइंगे आणि धनगर समाजातील अनेक समाज बांधव सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत हजर होते.
