Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोना गेला असे समजून वागू नका, तिसऱ्या लाटेचा धोका कायम: पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

Responsive Ad Here

मो.असलम परवेज:तालुका प्रतिनिधी

       आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

     कोरोणा संसर्ग नियत्रंण आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणाच्या सभागृहात करण्यात आले होते. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केल्याने या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठकीमध्ये दिले. जिल्ह्यात निर्माणाधीन असणारे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करावे व जिल्हा प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण करावा. कुठल्याही आपात्कालीन परिस्थितीत प्राणवायू ची कमतरता पडायला नको.


           पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ते पुढे म्हणाले, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोरोना सोबतच अन्य साथ रोग नियंत्रणा कडे सुद्धा लक्ष द्यावे, दूषित पाण्यामुळे साथरोग पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यामुळे कोरोना संसर्ग सुरक्षेचे नियम काटेकोर पणे पाळावे. कोरोनापासून वाचविण्यासाठी मास्क वापरावे, हात वारंवार स्वच्छ धुवावे किंवा सॅनीटाईज करावे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. या त्रिसूत्रीचा उपयोग करावा. आणि कोरोना गेला असे समजून वागू नका, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी केले. 

  याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, सहायक आयुक्त श्री बोर्डे  व संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.