Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अवैध गुटखा विक्री करणारा अटकेत

Responsive Ad Here

तालुका प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर प्रदीप रघुते 

                एकूण 3 लाख 35 हजार रुपयाचा माल जप्त

    नांदगांव खंडेश्वर येथे मागील काही महिन्यांपासून  मोठ्याप्रमाणात अवैध गुटखा विक्रीला उधाण आले आहे. अशातच गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण डॉ. हरी बालाजी एन. व अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगांव खंडेश्वर शहरातील मो. आरिफ मो. सुलेमान वय 45 रा. टेकडी पूरा नांदगांव खंडेश्वर याच्या सुपर कन्फेशनरी गोडाऊन मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाकू अवैधरीत्या विक्री करिता असल्याची माहिती मिळाता कारवाई करण्यात आली. यात आरोपी मो. आरिफ मो. सुलेमान याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण 3 लाख 35 हजार रुपयाचा 

    अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण डॉ. हरी बालाजी एन. व अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशीष चौधरी, ए. एस. आय. संतोष मुंदाने, नाईक पोलीस कॉन्स्टेबल रविन्द्र बावने, नाईक पोलिस कॉन्स्टेबल पुरूषोत्तम यादव, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कनोजिया, पोलीस कॉन्स्टेबल पंकज फाटे, चालक  हेडकॉन्स्टेबल नितीन कळमकर यांनी केली.