Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आशा/ गट प्रवर्तकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा

Responsive Ad Here

   प्रतिनिधी तळणी राजकुमार कांगणे

      माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दर्शविला पाठिंबा

     कोरोना काळात आशा/ गटप्रवर्तक यांनी प्रचंड मेहनत घेतली असून कोरोना योद्धा म्हणून त्यांचे काम खूपच प्रशंसनीय आहे. परंतु राज्यसरकार मात्र त्यांच्या मागण्यांकडे वारंवार व हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. मा. आरोग्य मंत्री यांनी मागील दीड ते दोन वर्षांपासून केवळ "उचित कारवाई करू असे म्हणत आहेत. त्यावर आता आशा/ गटप्रवर्तक यांचा विश्वास राहिलेला नाही म्हणूनच 15 जून 2021 पासून राज्यातील सर्व आशा/ गटप्रवर्तक संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित प्रश्न सरकारने सोडवावेत यासाठी राज्यव्यापी संप सुरु आहे. त्या संपात आरोग्य केंद्रातील सर्व गट प्रवर्तक आणि आशा सहभागी होत आहेत. त्यांच्या मागण्यांचा साकारात्मकरित्या विचार करून लवकरात लवकर त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. करिता पत्राद्वारे आशा/ गटप्रवर्तक यांच्या संपाला पाठिंबा देत असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

    आशा/गटप्रवर्तकांना सेवेत कायम करन्यात यावे. कोविड कामकाज करीता नुसती योद्धा म्हणून शाबासकी न देता किमान प्रतिदिन गटप्रवर्तकना 500 आणि आशा ना 300 रु विशेष भत्ता देण्यात यावा. त्यांना सर्व सुरक्षा साहित्य देण्यात यावे. यासह वारंवार पदावरून काढून टाकण्याची धमकी देऊन किंवा दबाव टाकून विना मोबदला वेठ बिगरासारखे काम करून घेणे बंद करून आशा/ गटप्रवर्तक यांना  वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी. असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे. 

    ऑनलाईन कामकाजाचा आणि इतर लागणारा स्टेशनरी खर्च देण्याची तरतूद करावी. कोविड लसीकरण करण्यासाठी आशा/गट प्रवर्तक सक्षम नाहीत असे त्यांचे मत आहे. त्यामुळे सारासार विचार करून योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण दिलेल्या जबाबदार योग्य पात्रतेच्या कर्मचाऱ्यांवर त्याची जबाबदारी देण्यात यावी. आशा/गट प्रवर्तक तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांना जर कोविड संसर्ग झाला तर त्यांना प्राधान्याने बेड, इंजेक्शन आणि इतर सुविधा देण्यात याव्यात.

तसेच आतापर्यंतचे आशा आणि गट प्रवर्तकांचे थकीत मानधन, मोबदला वाढीव रकमेसह त्वरित देण्यात यावा. अशी आशा/ गटप्रवर्तक यांची मागणी आहे त्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.