Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार-मेहकर येथील पोलिस निवासस्थानांचे काम सुरू होणार

Responsive Ad Here

 मो.असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधी

लवकरच निधी उपलब्ध होण्याचे गृहराज्यमंत्रीने दिले संकेत

      दिनांक १७ जून रोजी मुंबई येथे मेहकर मतदार संघातील लोणार- मेहकर येथील पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकाम संदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. लोणार-मेहकर येथील पोलिसांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकरच निधी मिळणारअसल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले.  

    यावेळी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितले की, मेहकर हे नागपूर मुंबई महामार्गावरील मुख्य शहर आहे, तर लोणार हे जागतिक कीर्तीच्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा दोन्ही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकर निधी मंजूर करण्यात यावा. यावर गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले की, दुसऱ्या टप्प्यात मेहकर व लोणारचा समावेश असून डोणगाव, जानेफळचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होणार आहे व लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील.

   तसेच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा पोलीस स्टेशनचे विभाजन करून देऊळगाव मही येथे पोलीस स्टेशन सुरू करावे व निवासस्थाने, कार्यालय बांधण्यात यावे व बीबी, संग्रामपूर, मोताळा येथे कर्मचारी निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी सुध्दा निधी मंजूर करावा अशी मागणी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी बैठकीमध्ये केली. या मागणीबाबत सुध्दा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी होकार दिल्याचे समजते. यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामांना वेग मिळणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सदर बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, माजी आमदार शशिकांत खेडेकर इत्यादी उपस्थित होते.