प्रतिनिधी हिवरखेड:-जितेश कारीया
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे अकोट तहसील अंतर्गत येणाऱ्या पोपटखेड धरण या ठिकाणी पूर परिस्थिती सारख्या नैसर्गिक आपत्तीतून निपटण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी नैसर्गिक आपत्ती टीम मार्फत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पूर परिस्थितीमध्ये बोटीचा उपयोग करून पुरामध्ये अडकलेल्या लोकांची कशी मदत केली जाईल आणि बचावकार्य कशाप्रकारे केल्या जाईल याचे प्रात्यक्षिक तलाठी सुनील कल्ले अकोला यांनी उपस्थित टीम मधील सदस्यांना प्रशिक्षण दिले. यावेळेस अकोटचे तहसीलदार निलेश मडके, नैसर्गिक आपत्ती विभाग अकोलाचे संदीप साबळे, मंडळ अधिकारी नेमाडे, मंडळ
अधिकारी प्रशांत सायरे, तलाठी गोपाल वानरे, प्राध्यापक सुधीर कोथळे, नितीन कोलटक्के, तुलसीदास फुकट, प्राध्यापक संकेत झालटे, मयूर डाखोरे, गुल्हाने, राठोड, इत्यादींनी सदर प्रशिक्षण घेतले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये काही अनुचित घटना घडली तर तात्काळ बचाव कार्य सुरू करून जीवितहानी टाळता येईल. तलाठी सुनील कल्ले यांनी आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या अनेकांचा जीव वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणी फाऊंडेशन मध्ये अद्वितीय कामगिरी करून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला आहे.
