अमरावती प्रतिनिधी
आज रात्री 9 वाजता च्या सुमारास शेंदोळा बू. ते पिंपळ विहिर रस्त्यावर डीगरगव्हाण येथील रहिवासी जितेंद्र भाऊ ढोके नामक व्यक्तीचा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव नितीन भाऊ मोहिते यांना दिली. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ युवा लॉयन्स ग्रुप शेंदोला बू. ची संपूर्ण टीम घटना स्थळी दाखल झाली.सदर युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला होता तेव्हा त्याच्या घरच्यांना माहिती देऊन लगेच अंबुलन्स च्या मदतीने जखमी युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले.
जितेंद्र भाऊ ढोके यांच्यावर पुढील उपचार जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे सुरू आहे, यावेळी घटनास्थळवर युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्रचे प्रदेश महासचिव नितीन दादा मोहिते, सचिन पवार, छत्रपती इंगोले,आकाश मोहिते,अतुल उमक, सूर्या उके,चेतन धस्कट,राहुल मोहिते,तेजस धस्कट,जीवन गायकवाड,सुरज मोहिते,गजानन वाघाडे,आदित्य मोहिते, अनिश पवार,विनोद पवार व इतर कार्यकर्ते उपस्तित होते
