जळगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद ,पंचायत समिती,नगरपालिका ,महानगरपालिका व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थामधील *इतर मागासवर्गीय (OBC) यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा-१९६१ कलम 12 (2)(C)* प्रमाणे मिळणारे 27%राजकीय आरक्षण पुर्ववत कायम होईपर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणा त्वरीत करावी अन्यथा महाराष्ट्रातील ओबीसींच्या 56,000 (छप्पन हजार ) प्रतिनिधी/उमेदवारांना फटका बसणार आहे.
या मागण्याचे निवेदन कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय *आमदार संतोषराव बांगर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे मुख्यमंञी मा.ना.उध्दवजी ठाकरे यांना नायब तहसिलदार श्री.प्रवीण ऋषी यांच्या मार्फत ओबीसी संघर्ष समिती ता.कळमनुरी च्या वतीने आज दि.२५ जून २०२१ रोजी देण्यात आले.
या शिष्टमंडळात नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे ,ओबीसी नेते राजेंद्र शिखरे ,फकीरराव मुंडे ,कळमनुरी तालुका ओबीसी संघर्ष समिती अध्यक्ष ॲड .रवि शिंदे ,सचिव विठ्ठल गाभणे ,उपाध्यक्ष उमेश गोरे ,सहसचिव ॲड .प्रभाकर मोरे,प्रसिध्दीप्रमुख प्रवीण राठोड,दिनकर कोकरे ,डाँ.प्रकाश नाईक ,केशवराव मस्के मसोडकर ,ॲड .संतोष राठोड ,अप्पाराव शिंदे ,अतुल बुर्से ,राजू संगेकर ,संभाजी सोनुने ,शरद सुरूसे ,ॲड .अमोल डिग्गीकर ,नारायणराव साळवे ,अशोक करे,गजानन शिंदे पुयनेकर ,सतीश तांभारे ,विलास मस्के ,अतुल वाघमारे ,शिवम नाईक ,शैलेश ढाले,राज थळपते,दिलीप मिरटकर,गजानन कापसे,अशोक भोजले,गजानन मोरे,कर्तारसिंग टाक,बबलुसिंग टाक,दत्ता गोरे,प्रफुल्ल पाईकराव ,आत्माराम सातव,सुनिल सातव ,अक्षय मस्के ,गणेश गुंजकर,प्रदीप मस्के ,सुदर्शन हाके,सुहास मस्के ,अरविंद मस्के ,शुभम सापनार यांच्यासह कळमनुरी तालुक्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सामिल होते.
