राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
मा. मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत परतूर येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन
महाराष्ट्र राज्यातील ओबीसींचे आरक्षण महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. नाकर्त्या राज्यसरकारने लक्ष दिले असते तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नसता परंतु महाविकास आघाडीच्या नाकर्त्या सरकारने मराठा आरक्षणा प्रमाणे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण देखील घालवले आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध ओबीसी समाजात प्रचंड असंतोष असून ओबीसी समाज महा वकास आघाडी सरकारला माफ करणार नाही ओबीसी समाजाचे आरक्षणाच्या जाण्याने प्रचंड नुकसान होणार आहे यामुळे आघाडी सरकारच्या विरोधात दिनांक 26 जून 2021 शनिवार रोजी प्रदेश भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने महाराष्ट्रव्यापी रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे
महाराष्ट्रव्यापी असणारे हे चक्काजाम आंदोलन राज्यातील प्रत्येक तालुका व जिल्हास्थानी होणार आहे त्या आंदोलनाची पूर्वतयारी पुणे माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परतूर येथील आमदार लोणीकर यांचे जनसंपर्क कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे
22 जून रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी ओबीसी समाजातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती संचालक नगरसेवक सरपंच उपसरपंच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीस आपण आवर्जून उपस्थितीत राहावे.
असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस कमलताई तुल्ले जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाराज वाघ ज्ञानेश्वर माऊली शेजुळ गणेशराव खवणे अशोकराव बरकुले किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जिजाताई जाधव भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस भाजपा परतुर तालुका अध्यक्ष रमेश भापकर भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्मळ भाजपा जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रकाश टकले भाजपा घनसावंगी तालुका अध्यक्ष संजय तौर भाजपा ओबीसी मोर्चा मंठा तालुका अध्यक्ष प्रसादराव गडदे मंठा पंचायत समिती सभापती शिल्पा पवार लातूर पंचायत समिती सभापती मनकर्णा रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात पंचायत समिती सदस्य दत्तराव कांगणे यांच्यासह अनेकांनी केले आहे