Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

Responsive Ad Here


    सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न

   २७ जून रोजी सिंदखेडराजा विश्रामगृहावर जेष्ठ नेते रमेशदादा कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे,तालुका समन्वयक विनोद प-हाड सर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ कायंदे,जेष्ठ नेते महेशभाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सर्वप्रथम स्व.जगनराव ठाकरे,मा.उपनगराध्यक्ष सिंदखेडराजा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांनंतर तालुका काँग्रेस कमिटीचा आढावा, निरीक्षक विनोद प-हाड सर यांच्या मार्फत जिल्हाध्यक्षांना देण्यात आला.

       त्यानंतर आगामी जि.प. व पं.स. निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सरपंच यांचा सत्कार राहुल भाऊ बोन्द्रे यांनी केला. किं.राजा चे सरपंच ज्ञानेश्वर गोविंदराव कायंदे, वसंतनगर सरपंच व नवनियुक्त खरेदी विक्रीचे संचालक सुभाषराव जाधव, सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष नवनियुक्त अशपाक पठाण, कोनाटी सरपंच, परमेश्वर खंदारे तथा कंडारीचे ग्रा.पं.सदस्य शिवाजी खरात यांचा पक्षप्रवेश व सत्कार झाला.

        पक्षाचे सतत निष्ठेने काम करत असल्याबद्दल सोपानराव  खरात ,कारभारी खरात,व अन्य कार्यकर्त्यांचा सत्कार राहुलभाऊ यांनी करून समाधान व्यक्त केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या विषयावर सखोल चर्चा करून काँग्रेस पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  सोनोशी जिल्हा परिषद सर्कलची जबाबदारी सिद्धार्थ जाधव व कारभारी खरात यांना देण्यात आली दुसर बीड सर्कल कचरूजी भारस्कर व जुनेद अली यांना देण्यात आली किनगाव राजा सर्कलची जबाबदारी ज्ञानेश्वर कायंदे यांना देण्यात आली, साखरखेर्डा शिवदास रिंढे यांना देण्यात आली

    यावेळी तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे,शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव,कार्याध्यक्ष उल्हास भूसारे, दिपक जगनराव ठाकरे,कचरुजी भारस्कर साहेब, सुनील जायभाये,सुभाष कोकाटे, राहुल साबळे,पांडुरंग शिंगणे,गजानन तुपकर, समाधान काकड,मदन आघाव,कदीर भाई, अमर जाधव अमित जाधव रहेमान भाई तथा तालुका/शहर कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.