Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांची आज १४७ वी जयंती

Responsive Ad Here

संपादकीय

      राजर्षी छत्रपती शाहू महाराज ( जन्म २६ जून, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध. ते एक थोर समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व समाजातील गोरगरीब, वंचित घटकांच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले आणि सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. त्यांनी दलित (अस्पृश्य), मागासवर्गीय, गोरगरीब व वंचित समाजाच्या विकासासाठी व सामाजिक न्यायासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व समाज घटकांना समान न्याय व समान संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेती हा अपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तेव्हा ‘शेतीचा उद्धार 

     म्हणजे शेतकऱ्यांचा उद्धार,पर्यायाने देशाचा उद्धार,’ हे सूत्र ध्यानात घेऊन राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानात शेतीसाठी मूलभूत सुधारणा केल्या. नव्या-जुन्या विहिरी, छोटे-मोठे तलाव, लहान-मोठे बंधारे या सर्वांच्या नोंदी त्यांनी करून, त्यांची कामे हाती घेण्यात आली. नव्या विहिरी, नवे तलाव व छोटे-छोटे बंधारे यांच्या योजना तातडीने अंमलात येऊ लागल्या. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण पहिल्यांदा शाहू महाराजांनी राबविले. त्याचे महत्त्व शंभर वर्षांनंतर आपल्याला आता उमगले आहे. 

  शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलन, अस्पृश्य व गरीब समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन अशा विधायक कार्याद्वारे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहीणाऱ्या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आज १४७ वी जयंती. अशा या लोक *लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांची आज १४७ व्या त्यांच्या जयंती दिनी त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा!* 💐💐🙏🙏


#राजर्षी छत्रपती शाहू महाराज ( जन्म २६ जून, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध. ते एक थोर समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व समाजातील गोरगरीब, वंचित घटकांच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले आणि सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. त्यांनी दलित (अस्पृश्य), मागासवर्गीय, गोरगरीब व वंचित समाजाच्या विकासासाठी व सामाजिक न्यायासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व समाज घटकांना समान न्याय व समान संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेती हा अपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तेव्हा ‘शेतीचा उद्धार म्हणजे शेतकऱ्यांचा उद्धार,पर्यायाने देशाचा उद्धार,’ हे सूत्र ध्यानात घेऊन राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानात शेतीसाठी मूलभूत सुधारणा केल्या. नव्या-जुन्या विहिरी, छोटे-मोठे तलाव, लहान-मोठे बंधारे या सर्वांच्या नोंदी त्यांनी करून, त्यांची कामे हाती घेण्यात आली. नव्या विहिरी, नवे तलाव व छोटे-छोटे बंधारे यांच्या योजना तातडीने अंमलात येऊ लागल्या. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण पहिल्यांदा शाहू महाराजांनी राबविले. त्याचे महत्त्व शंभर वर्षांनंतर आपल्याला आता उमगले आहे. 

  शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलन, अस्पृश्य व गरीब समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन अशा विधायक कार्याद्वारे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहीणाऱ्या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आज १४७ वी जयंती. अशा या लोक कल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा!