अमरावती प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू डॉ. विलास भाले यांचे सिनेट सदस्य डॉ.मनीष गवई यांनी केला सत्कार
अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा आज पाच वर्षाचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ समाप्त होऊन कुलगूरू पदाचा प्रभार डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी स्वीकारल्याबद्दल राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई यांनी त्यांचा भारतीय संविधानाची उद्देशिका व संत गाडगे बाबा यांची दशसूत्री कार्यक्रमावाली देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, मावळते प्र-कुलगुरू डॉ.राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ.तुषार देशमुख, परीक्षा संचालक डॉ.हेमंत देशमुख,अधिष्ठाता डॉ.एफ. सी रघुवंशी,अधिष्ठाता डॉ.अविनाश मोहरील,वित्त व लेख अधिकारी डॉ. बी. डी कराड, श्री धनराज चक्रे,सम्राट नोकरी संदर्भचे राजेंद्र इंगळे,श्री बाळाधन गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.. पदभार स्वीकारताच यांनी रिसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन पदाच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत वाढ करावी.
कारण सदरची जाहिरात हि लोकडाऊन काळात प्रसिद्ध करण्यात आल्याने सर्व सायबर कॅफे बंद असल्याने विध्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता आले नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत वाढ करावी अशा आशयाचे पहिले विध्यार्थी हिताचे पहिले निवेदन प्रभारी कुलगूरू डॉ. विलास भाले यांना देण्यात आले हे निवेदन प्रशासकीय कारणास्तव कुलसचिव डॉ.तुषार देशमुख, यांनी स्वीकारले. सत्कार स्वीकारताना डॉ. भाले यांनी विद्यापीठाच्या हितासाठी आपण सोबत राहून कार्य करावे असे स्पष्ट केले. या प्रसंगी सिनेट सदस्य डॉ.मनीष गवई यांनी प्रभारी कुलगूरू याना विद्यापीठ विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याबाबत आश्वस्त केले.
