Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती संपूर्ण चोपडा तालुका सहभागी

Responsive Ad Here

 जळगाव प्रतिनिधी

             आय टक 21जूनला आंदोलनाचा एल्गार

चोपडा ..महाराष्ट्र राज्यातील 67 हजार आशा स्वयंसेविका व 3 हजार गटप्रवर्तक 15 जून2021 पासून बेमुदत संपावर आहेत.

 त्यांना आत्ता अत्यंत कमी मानधन मिळते. त्यांना कोरोना संबंधित कामासाठी दररोज ८ तास काम करावे लागते. त्या अत्यंत जोखमीचे व जबाबदारीचे काम करतात. महाराष्ट्र सरकार त्यांना वेठविगारा सारखे वागवित आहे. त्यांना योग्य किमान वेतन व कोरोना संबंधित कामासाठी योग्य भत्ता मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे‌.


   या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री व माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांशी कृती समितीच्या नेत्यांची वेळोवेळी सविस्तर चर्चा झाली होती. आशा व गटप्रवर्तक या आरोग्य खात्याचा कणा आहेत. त्या आघाडीवरच्या योध्या आहेत, त्यांच्याबद्दल सरकारला आदर आहे, असे मुख्यमंत्री  व आरोग्य मंत्री महोदय सांगतात. परंतु महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे, आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करणे, सरकारला अशक्य आहे, असे माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी शेवटच्या मिटींगमध्ये भूमिका घेतली होती. त्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांनी संप बेमुदत बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे त्याचाच भाग म्हणून  त चोपडे तालुक्यातील 47 आशा यांनी चोपडे  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय सहायक आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी  नगर परिषद कार्यालय चोपडे  यांना निवेदने सादर करून  आमच्या मागण्यांवर विचार करेपर्यंत आरोग्य खात्याच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

     व येत्या 21जून रोजी टी एम ओ व चोपडा नगर परिषद वर सकाळी 11 वावंदना धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावेळी निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ अमृतराव महाजनयांचे नतृत्वात  तालुका, अध्यक्ष मीनाक्षी सोनवणे,सचिव ,वंदना पाटील , वंदना सोनार शालिनी पाटील विद्या कोळी सुरेखा कोळी शहर पदाधिकारी पल्लवी पाटील ज्योती सोनवणे आरती कपुरे योगिता मिस्त्री, आदी 47 आशा उपस्थित होत्या.