नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे
तीन वर्षापासून रखडले पोलीस भरती
येवला - कोरोना संकटामुळे अनेक युवकावर बेरीजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढतच असताना तीन वर्षात पोलीस भरती झालेले नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून भरतीसाठी सराव करीत असलेल्या युवकांमध्ये नैराश्य पसरलेले आहे बेरोजगार युवकांना मध्ये राज्य सरकारच्या या धोरणामुळे तीव्र पडसाद उमटत आहे
नाशिक जिल्हा सह राज्यात २०१८ पासून एकही जिल्ह्यात पोलीस भरती झालेली नाही पोलीस भरती घेण्यासंदर्भात गृहमंत्री व इतर मंत्र कोण खूप घोषणा झाल्यात परंतु अद्याप पोलीस भरतीची तारीख जाहीर झाली नाही नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलीस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्याचे भरून घेण्यात आले परंतु त्याच्याही पुढे कोणतीही प्रक्रिया राबवली गेली नाही पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बहुसंख्य उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे बहुसंख्य विद्यार्थी कष्टकरी शेतकरी व मजुराची आहेत ही मुले शहरच्या ठिकाणी राहून अभ्यास करतात अकॅडमी लावतात पुस्तके व मेस या सर्व गोष्टी चा हा खर्च त्यांना पेलवत नाही
पोलीस भरती प्रकिया राबवली न गेल्याने विद्यार्थीचे वय वाढले आहे विद्यार्थी नैराश्यत गेले आहेत या युवकांचे पालक पूर्णपणे खचून गेलेले आहेत
साडेबारा हजार जागेची भरतीची प्रतीक्षा
राज्यात एकाच वेळी जाहीर केलेल्या १२ हजार ५२८ पदाची भरतीची प्रकिया राबवली जावी ही भरती करताना कोरोनामुळे ज्यांची वयोमर्यादा संपली आहेत अश्या उमेदवारना सवलत द्यावी अशी ही मागणी होत आहेत
★ पोलीस भरती कडे ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर वर्ग डोळे लावून वाट बघतोय कोरोना या मागणीमुळे अनेक लोक बेरोजगार झालेत तर संपूर्ण मध्यवर्गीय हलाखीच्या परिस्थितीतून सामना करीत आहे तरुणांना रोजगाराची व सरकार ला पोलीस शिपाई जागा भरणे निकडीचे झाले आहे तीन वर्षांपासून भरती न झाल्याने अनेकांनी वयोमर्यादा ओलांडली तर काहींनी भरतीचा नाद सोडला आहे भरती मागे लागून उमेदीची वर्ष वाया घालवण्याची भावना तयार झाली आहे
कुणाल भावसार ( समाजसेवक )
अध्यक्ष - शिवसेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
संचालक - शिवसेवा व रणभूमी करीअर अकॅडमी येवला
◆ विद्यार्थी - राम गोरख लासुरे
दुगलगाव बोकटे ( येवला)
एम पी एस सी , रेल्वे परीक्षा झाली मग पोलीस भरती का नाही ? महाराष्ट्रात कोरोना च्या काळात एमपीएससी परीक्षा घेण्यात आली व रेल्वे परीक्षा तसेच आरोग्यच्या परीक्षा घेतल्या जातात रेल्वे व इतर केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात निवडणुका घेतल्या जातात मुलीचे लग्न झाल्या नंतर ही भरती होण्यास मर्यादा घेतात त्या मुळे तात्काळ भरती प्रक्रिया करावी

