Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

उत्तम ब्राम्हणवाडे सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Responsive Ad Here

 प्रदिप रघुते येनस

       विविध स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव  अनेक संघटनाशी आहे सलोख्याचे संबंध

    सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथिल पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे हे विविध वृत्तपत्रांत काम करत आहे त्यांची नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांचे सोबत सलोख्याचे संबंध आहे,यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी  महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे.  आज पर्यंत राज्य कार्यकारिणी ने  शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या हे उल्लेखनीय आहे.

        नांदगाव खंडेश्वर  येथील वृत्तपत्र प्रतिनिधी त्यांच्या कामाचा संघटना वाढीसाठी अनुभव बघता त्यांच्या खांद्यावर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी राज्य कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, जिल्हाध्यक्ष रणजित तिडके, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत ठाकरे,  यांच्या हस्ते नियुक्ती पत्र  देण्यात आले . ते आपल्या नियुक्तीचे श्रेय सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, अमरावती विभागीय अध्यक्ष कपील देवके, अमरावती जिल्हा अध्यक्ष रणजित तिडके, विभागीय संघटक प्रमोद निर्मळ, राज्य प्रसिद्धी प्रमुख, मंगेश तायडे, तालुकाध्यक्ष पंकज मेटे, सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, सरपंच माझाचे संचालक रामनाथ बोर्हाडे,  यांना देत आहे . त्यांच्या नियुक्ती मुळे सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव व स्वागत होत आहे