Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खामगाव चितोडा गावातील दलित कुटुंबावरील हल्ला अमानुष असून हल्लेखोरांवर कारवाई करा

Responsive Ad Here

 प्रतिनिधी नांदुरा

      निरपराध लोकांवर दरोड्याच्या खोट्या केसेस दाखल केलेल्या असून त्या तात्काळ मागे घेण्यात याव्या -भाई वैभव वानखडे

     बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील चीतोडा गावातील अंबिका नगरातील रमेश हिवराळे या दलित तरुणावर जीवघेणा हल्ला सवर्ण  समाजातील वाघ कुटुंबातील 10 जणांनी तलवार गुप्ती लाठी काठी घेऊन केला. हा हल्ला अत्यंत अमानुष हल्ला होता. या हल्ल्याचा युवा भिमसेना सामाजिक संघटने तर्फ़े तीव्र निषेध करीत आहोत. हा अमानुष  हल्ला करणाऱ्या आरोपींची  पाठराखण करण्याची कोणीही  भूमिका घेणे अत्यंत निषेधार्ह आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष द्यावे. असे आवाहन  युवा भिमसेना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैभव वानखडे यांनी दिला आहे. 

 


 या  हल्ल्यात रमेश हिवराळे गंभीर जखमी असून त्यांच्या बहिणी चे हाताची बोटे तुटली तर आईच्या हातावर तलवारीचा वार झाला आहे.   या प्रकरणी स्थानिक शिवसेना खासदार प्रताप जाधव  तसेच बाजूच्या मतदारसंघातील बुलडाणाचे  शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी गावात भेट देऊन एकतर्फी चिथावणीखोर वक्तव्य केले असल्याची माहिती पुढे आली आहे.ऍट्रोसिटी गुन्हा मागे घेण्यासाठी पिडित दलितांवर रॉबरी चोरीचे खोटे गुन्हे दाखल करा काही जास्त झाले तर मी 10हजार जणांची फौंज घेऊन येतो;  शस्त्र अस्त्र पुरवतो असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. हे लिकप्रतिनिधीला शोभणारे वक्तव्य नाही.या वक्तव्याचा युवा भीमसेने तर्फे आम्ही तीव्र निषेध करतो.त्यांच्या  वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी. आणि संजय गायकवाड याला पक्षातुन काढून टाकण्यात यावे अशी मागणी भाई वैभव वानखडे यांनी केली आहे.

    या प्रकरणी सर्व हल्लेखोरांवर कारवाई करावी कोणत्याही निरपराधावर कोणताही गुन्हा दाखल करू नये याची काळजी घेण्याबाबत आव्हान केले. यावेळी उपस्थित युवा भिमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैभव वानखडे , जिल्हा अध्यक्ष- जितू गोळे. तालुका अध्यक्ष भाई अमोल वाकोडे. ता,सचिव अशांत भाई राणीत , ता,कार्यध्यक्ष सुमित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुकेश वाकोडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष गजानन जाधव, ता कार्यध्यक्ष धम्मपाल वाघ ,वंचित बहुजन आघाडीचे ता,उपाध्यक्ष धर्मेश तायडे, शुभम भिडे,प्रशांत हिवराळे दीपक वानखडे, राहुल राणीत ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष राष्ट्रपल सपकाळ,संघर्ष वानखडे आकाश सरदार रोशन सरदार, देवानंद वानखडे  धनराज इंगळे रोशन पानपटील  रोहित पाहुरकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.