संजय पवार प्रतिनिधी अमरावती
सेव्ह लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्थे तर्फे गोपाल नगर अमरावती शहरामधील कोव्हीड-19 मुळे जे व्यक्ती स्वर्गवासी झाले .त्यांच्या स्मृती पित्यर्थ गोपाल नगर मराठा कॉलनी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. व या कोरोना च्या महामारी मध्ये संपूर्ण देशाला माहिती आहे की झाडाचं महत्व किती आहे खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हे आपल्याला झाडच देते व त्या ठिकाणी सेव्ह लाईफ फाउंडेशन नि संपूर्ण जनतेला आव्हान केलं झाडे लावा झाडे जगवा असे सांगण्यात आले .
वृक्षारोपण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चेतन पवार ,नगरसेवक तथा गटनेता ,आणि प्राचार्य दीपक धुरंदर सर ,संजय शेटे शिवसेना महानगर प्रमुख ,तसेच सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक :श्री अमर कडू ,सचिव : गौरव नाखले ,कोषाध्यक्ष: सचिन कडू , उदय नवखरे , ऋषी भुजाडे,शुभम जिचकार,संदीप कुटारीया,सागर येवतकर,सुधीर मानके,शंकरराव माटोडे,महेंद्र अगस्ती,अक्षय धोटे,विशाल कडू,सागर तोंडे,सचिन हिंगे,गोपाल जायभाये,अभिजित इंगोले,कुणाल जिचकार,दीपक इंगळे,अंकित कबीरे,उमेश राऊत, सिद्धान्त नन्नावरे,सुमित ठवकर,राहुल बंड,मंगेश लोणकर,अनिता सुभाषराव येवतकर,रंजना उपरिकर, रेणुका येवतीकर इत्यादी उपस्थित होते
