Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दुचाकींचा भीषण अपघात 4 जखमी

Responsive Ad Here

जितेश कारीया@ हिवरखेड

    हिवरखेड अकोट राज्यमार्गावर खंडाळा फाट्यावरील घटना

               हिवरखेड अकोट राज्यमार्गावर खंडाळा फाट्यावर दि 22 जुलै गुरुवार रोजी सकाळी दोन मोटर सायकलींची अमोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ज्यामध्ये एकूण 4 जण जखमी झाले. MH 30 Z- 7461 आणि MH28 AM 8945 ह्या दोन मोटरसायकली मध्ये ही धडक झाली. हा अपघात पाहताच डॉ. शेख (मुंबई), तुळशीदास खिरोडकार सर यांच्यासह अनेक नागरिकांनी रुग्णांना केली मोलाची मदत. डॉ शेख यांनी आपल्या स्कॉर्पिओ गाडीने रुग्णांना तातडीने हिवरखेड आरोग्यवर्धिनीत आणले. 



तेथे  डॉ आनंद बराटे, डॉ नेहा तायडे यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी आणि शर्थीचे प्रयत्न करून आपल्या कर्तव्यतत्परतेची जाणीव करून दिली. हिवरखेड येथून प्रथमोपचार करून अकोला येथे रेफर करण्यात आले. जखमींमध्ये करी रूपागड येथील नानसिंग धेडू अहिऱ्या वय 36, सुरेश नानसिंग अहिऱ्या वय 12, खंडाळा येथील आसिफ खान वय 50 शे. मुसा शे. शरमुद्दीन वय 60 ह्या चौघांचा समावेश आहे.

                          नाकाचा तुकडा झाला वेगळा

      ह्या अपघातात नानसिंग अहिऱ्या यांच्या नाकाचा एक भाग कटुन  वेगळा झाला आहे. त्यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला आहे. त्यांच्या नाकातून आणि इतर ठिकाणातून निरंतर रक्ताच्या धारा वाहत होत्या.  रेफर केल्यावर त्यांच्या नाकाची मायक्रो प्लास्टिक सर्जरी करावी लागेल अशी माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली.