मो.असलम परवेज:लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या अकोला "जनता कमर्शियल बँके" ला आग लागल्याची घटना २२ जुलै २०२१ रोजी रात्री ९:२५ वाजताच्या सुमारास घडली. बँकेमधून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी गर्दी करून पाण्याचे टँकर द्वारे ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
बँकेच्या शटर मधून धुराचे लाट बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे तेथे कर्तव्यावर असलेल्या वॉचमनने त्वरित शटर उघडले पण बँकेत मोठा दूर असल्याने कोणालाही बँकेचे आज जाणे संभव होत नव्हता. आगीचे वृत्त शहरात पसरताच नगर परिषदेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. थोड्याच वेळात अग्निशामक दलाची गाडीहि घटनास्थळी पोहोचली व तातडीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. वॉचमनच्या सतर्कतेमुळे बँकेची मोठी वित्तीय हानी टळल्याने सर्वत्र वाचमेनचे कौतुक करण्यात येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे वृत्त लिहीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही, शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज दर्शविण्यात येत आहे.