Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

निराधार महिलेच्या कोसळलेल्या झोपडीला पटवऱ्यानी दिला आधार

Responsive Ad Here

  हिवरखेड जितेश कारीय

        हिवरखेड आठवडी बाजारातील दोन्ही डोळ्यांनी निकामी महिलेला महसूल विभागाची शासकीय मदत,

    हिवरखेड येथील आठवडी बाजारात राहणाऱ्या दोन्ही डोळ्यांनी निकामी असलेल्या दिव्याग महिलेची झोपडी १९  जुलैच्या रात्री पावसाच्या लाटांनी कोसळी  झोपडी कोसळल्याने त्या महिलेचा मुलगा त्याच्या दोन्ही डोळ्यानि निकामी असलेल्या आईला घेऊन रस्त्यावर आला झोपडी पडली आता आपण कुठं राहावे शासनाने आधीच घरकुल दिले असते तर आज आपण आई रस्त्यावर नसतो असे बोल मुलाने आईला सांगितले  यांच्या हालाकीच्या परिस्थिती जाण शेवटी गावातील प्रसिद्ध पत्रकारांना आली व त्यांनी ही माहिती शासन दरबारी पोचवली आणि आज दिनांक २२ जुलैच्या सकाळी तेल्हारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांच्या आदेशानुसार गावातील पटवारी रोशन देशमुख प्रभाग क्र १,  यांनी   कोसळलेल्या झोडी जवळ प्रत्येक्ष जाऊन पंचनामा केला व शासकीय मदत आणि गहु तांदूळ  देऊन मदत केली.




   निराधार महिला निर्मलाबाई वारुळे व त्याचा मुलगा अक्षय वारुळे यांनी मदत स्वीकारली असता यांचे हुंदय भरून आले, कोणीतरी वाली आम्हा गरीबाच्या मदतीला पुढा आला असे मनोगत यांनी व्यक्त केले,  शासनाने या लाभार्थ्यांना घरकुल मिळून द्यावे अशी सुद्धा यांची मागणी आहे, यावेळी उपस्थित तलाठी  रोशन  देशमुख, पत्रकार अर्जुन खिरोडकार, कोतवाल प्रमोद  इंगळे, निखिल कराळे, राष्ट्रपाल इंगळे, शहजाद खान हे उपस्थित होते,