प्रतिनिधि हिवरखेड: जितेश कारीया
कोरोना मारामारीच्या संकटात अजूनही ग्रामीण भागात गैरसमज असून ग्रामीण जनजीवन अस्वस्थ आहे, लसीकरणा संदर्भात गैरसमज हा संपूर्ण अडसर असल्याने त्यांच्यात व नवीन delta प्लस व्हायरस, मानसिक मुलांचे आरोग्य यांचे प्रबोधन चर्चा करून व्हावे, यासाठी निसर्ग प्रेमी फाऊंडेशन हिवरखेड यांचे कार्यकर्ते 5 दिवस हे अभियान यशस्वी रित्या संपन्न करणार आहे त्याचा आजचा पाहिला दिवस.
कोरोना काळात लोकांच्या दारापर्यंत कोरोना जागृती मोहीम पोहोचवून त्यांच्यातील संभ्रमावस्था दूर करत कोरोना काळात कशाप्रकारे आपण delta प्लस व्हायरस ला या संकटाला तोंड देता येईल त्यांचा उपाय योजना या जनजागृती परिपत्रकात दिलेल्या आहेत.
निसर्ग प्रेमी फाऊंडेशन हिवरखेड चे मनीष पिंजरकार यांनी जनजागृती परिपत्रक प्रकाशन करण्यात आले आहे. यामध्ये हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री चव्हाण साहेब, व ईतर कर्मचारी, अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी व प्रेस क्लबचे प्रतिनिधी व शिवशंभू संघटनेचे पवन गावत्रे, निसर्ग प्रेमी फाऊंडेशन चे धनंजय गावंडे, रितेश इंगळे, अक्षय ढोकणे, आकाश इंगळे, राम ढोले, वैभव भोयर, सलमान खान, अक्षय तिजारे, प्रलय येऊल यांनी हे परिपत्रक प्रकाशित केले.
तसेच अकोला जिल्हा पालकमंत्री महोदय श्री बच्चू भाऊ कडू यांची तेल्हारा दौरा असताना हिवरखेड येथे सदिच्छा भेटी दरम्यान त्यांना या जनजागृती अभियानाचे परिपत्रक देऊन या अभियानाची संपूर्ण माहिती सांगितली "असेच चांगले कार्य करा व जनतेला जागृत करा" अशी कौतुकाची थाप साहेबांनी मारली.
हे परिपत्रक हिवरखेड, मालठाना, अकोली, गोर्धा, तळेगाव, व ईतर ग्रामीण भागात जाऊन लोक संवादाच्या माध्यमातून नागरिकांना जागृत करण्याचे कार्य यशस्वीपणे संपन्न केले.
