संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगावराजा
शासनाच्या 2012 स्पोर्ट कोड नुसार एक स्टेट एक असोशियन च्या शुटींग बॉल खेळामध्ये विदर्भाचे सदस्य भारत सरकारच्या एका शासकीय पत्रानुसार एक राज्य एक फेडरेशन घोषित करण्यात आले त्यानुसार विदर्भ शूटिंग बोल चे महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल फेडरेशन मध्ये विलिनीकरण करण्यात आले . महात्मा ज्योतिबा फुले सभागृह नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वागत अध्यक्ष नांदगावचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शना मध्ये सभा पार पडली .
तसेच शूटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया चे सचिव रवींद्र तोमर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते दरम्यान विदर्भ शूटिंग बॉल फेडरेशन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके, सचिव शकीलोउद्दीन काजी चे मार्गदर्शनाखाली अकोला संघटने चे अध्यक्ष राकेश सिंह बयस सचिव एम एस शेख वाशिमचे त्रिंबक राजे बुलढाणा चे अशोक चाटे या सर्व विदर्भ अंतर्गत येणारे सगळे जिल्हा चे पदाधिकारी सामील झाले होते या मिटिंग मध्ये विदर्भ चे महाराष्ट्र मध्ये विलिनीकरण केल्या गेले.
राज्याची नवी असोशियन ची कार्यकारिणी तयार करण्यात आली व मंजुरी देण्यात आली. कार्यकारिणीमध्ये विदर्भाचे चार पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला या मध्ये विदर्भाचे तात्कालीन अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांची महाराष्ट्राच्या राज्य शूटिंग बाॅल असोशियन उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच विदर्भ चे तत्कालीन सचिव शकीलोउद्दीन काजी यांची महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोशियन कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यानंतर डॉ. सुभाष गावंडे यांची सहसचिव तथा वाशिम चे त्रिंबक राजे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
