Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आमदारांच्या निलंबन प्रकरणी जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन आक्रमक

Responsive Ad Here

 जळगाव दि.प्रतिनिधी 

         विधीमंडळात भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आमदार गिरीश महाजन यांच्या पत्नी आज रस्त्यावर उतरल्या. साधना महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेरात भाजपतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. 

     ओबीसी आरक्षणच्या मुद्यावर भाजप आमदारांनी विधानसभेत आवाज उठवत विरोध केला. त्यामुळे महविकास आघाडी सरकारने बारा आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले. या निर्णयाच्या विरोधात आक्रमक होत भाजपने आज राज्यभरात एक हजार ठिकाणी कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केले. निलंबित आमदारांमध्ये समावेश असलेल्या गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनीच निषेध मोर्चाचे नेतृत्व करत आंदोलन केले. जामनेर येथे बाबाजी राघो मंगल कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले.