Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टरच नाही

Responsive Ad Here

हिवरखेड जितेश  कारीया

     सतत डॉक्टर गैर हजर राहत असल्याने पशुपालकांना हेलपाटे

आठवडी बाजारात असलेला पशुवेदकीय दवाखाना डॉक्टर नसल्याने निकामी दिसत आहे,  या अगोदर या दवाखान्यात काम्यस्वरूपी डॉक्टर कोरडे मनुन होतें ,परंतु काही कारणास्तव त्याची बदली झाली किंवा त्यांनी बदली केली त्यामुळे ते येथून स्थलांतर झाले ,तेव्हापासून इथं कायस्वरूपी डॉक्टर नाहीत, अधून मधून अडगाव बु येथील डॉक्टर येतात तर गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी सेवा देतात , कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने गावात व परिसरातील  पशुपाल्यांचे जनावरे आजारी झाले तर त्यांना बऱ्याचदा हिवरखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातुन परत जावे लागते, 

   वेळेवर जनावरांना उपचार मिळत नसल्याने पशु प्रेमींना हेलपाटे सहन करावे लागत तर काहींची जनावरे दगावतात  आणि पशुपाल्याना  आवश्यकतेवेळी  खाजगी कामगीरी बजवावी लागते,   आठवडी बाजारातील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर द्या अशी मागणी गावातील पशू प्रेमी करीत आहेत.हिवरखेड पशुपालकांचे  जनावरे आजारी झाल्यास  त्या जनावरांचा तात्काळ  उपचार व्हावा  या करिता वरिष्ठांनि येथे कायमस्वरूपी डॉक्टर द्यावा,

                              प्रतिक्रिया

           डॉक्टर नसल्याने येथे  जनावरांचे मोफत औषध सुद्धा मिळत नाही खाजगी औषध  बाहेरून घ्यावे लागते.अर्जुन खिरोडकार (पशुप्रेमी हिवरखेड,)

माझ्या गायचा वेळेवर उपचार झाला असता तर माझी गाय आज  जिवंत असती ,माझी पाळीव गाय काल रात्री  वेळेवर उपचार न झाल्यामुळे वारली.जुबेर खा (पशुपाल्य हिवरखेड,)