मो.असलम परवेज: तालुका प्रतिनिधी
लोणार तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक ६ जुलै २०२१ रोजी डिझेल, पेट्रोल, गॅस या इंधनासह खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ वाढलेल्या किमतीच्या निषेधार्थ लोणार बसस्थानकासमोर मोठे आंदोलन करण्यात आले.लोकसभेच्या निवडणुकीत महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा सरकारने महागाई कमी केले नाही. शिवाय जनतेच्या मानगुटीवर विपरीत महागाई बसवली असा आरोप करत डिझेल, पेट्रोल, गॅस या इंधनासह खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ वाढलेल्या किमती मागे केंद्र सरकारची धोरणे आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन द्वारे केले.
सरकारच्या वतीने निवडणुकीला सामोरे जाताना देशातील जनतेला आश्वासन दिले होते की, त्यावेळी जे 60 रुपये प्रति लिटर पेट्रोल, 57 रुपये डिझेल, 414 रुपये गॅस सिलेंडर, 52 रुपये किलो खाद्य तेलाचे दर होते. हे दर कमी करू मात्र आता तेच पेट्रोल 107 रुपये, डिझेल 97 रुपये प्रति लिटर, गॅसची किंमत 910 रुपयांवर गेली, खाद्यतेल 180 रुपये किलोवर पोहोचले आणि एकूणच महागाईचा आलेख जनतेच्या परवडण्यापलीकडे गेला. असा आरोप आज राष्ट्रवादीच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत करण्यात आला. यावेळी लोणार तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
