Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आमदारांचे निलंबन एक वर्षाचे न करता कायम स्वरुपी व्हावे - हर्षल माने,जिल्हा प्रमुख शिवसेना

Responsive Ad Here

  गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

 एरंडोल-पारोळा,चाळीसगाव,पाचोरा व भडगाव विधानसभा क्षेत्र शिवसेना पदाधिकारी यांच्या कडून जाहीर निषेध.

प्रतिनिधी - एरंडोल भाजपच्या १२ आमदारांचे जे एक वर्षासाठी निलंबन झाले आहे ते निलंबन त्यांनी केलेल्या कृत्याचा आधारे हे एक वर्षाचे न करता त्यांना कायम स्वरुपी निलंबित करावे असे आवाहन जळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ.हर्षल माने यांनी केले. दि.७ जुलै २०२१ बुधवार रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात  पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले असून सामान्य नागरिकांना जिवन जगने मुश्कील झाले असल्याचे म्हटले आहे.तसेच गॅसचे दर खुप वाढल्यामुळे सर्व साधारण लोकांना गॅस वापरणे देखील मुस्कील झाले असल्याचे म्हटले आहे यामुळे सदर बाबतीत केंद्र सरकार गोर गरिब जनतेचा छळ करत असुन गॅस , डिझेल , प्रेट्रोल इंधन दरवाढ कमी न झाल्यास यापुढे एरंडोल तालुका शिवसेने तर्फे केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे तसेच मा.तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या अवमानाबद्दल विधानसभेत गैरवर्तणुक करणान्या १२ आमदारांचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.याप्रसंगी धरणगाव चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले व यावेळी काही क्षणा साठी महामार्ग वर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

    याप्रसंगी संपर्क प्रमुख गुलाब वाघ,जिल्हा प्रमुख डॉ.हर्षल माने,महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,तालुका प्रमुख वासुदेव पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,कासोदा विभाग प्रमुख सरिता मंत्री,शहर प्रमुख कृणाल महाजन,विभाग प्रमुख रविंद्र जाधव,पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन,कैलास पारधी,विठ्ठल पाटील,उपतालुका प्रमुख रविंद्र चौधरी,रमण पाटील,राजेंद्र बडगुजर,रमेश जमादार,निलेश मराठे,विनोद पाटील,अरुण महाजन,संदिप पाटील,प्रमोद महाजन,संदिप मराठे,राजेंद्र धनगर,महेश पांडे,महेश महाजन, रेवानंद ठाकुर आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     दरम्यान यावेळी डॉ.माने हे जिल्हा प्रमुख पदी नियुक्त झाल्यानंतर शिवसेनेतर्फे या पहिल्या आंदोलन प्रसंगी आमदार चिमणराव पाटील व डॉ.माने हे एकत्र पहावयास मिळतील हा राजकीय निरीक्षकांचे अंदाज प्रत्यक्षात अंदाजच राहिला.