जळगाव जामोद प्रतिनिधी
जून महिना उलटून जुलै महिला संपत आलाय पण अजूनही जळगाव जामोद तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. याउलट घाटावरील चिखली,मेहकर या भागात पावसाने दमदार हजेरी लागली.यावर्षी सुरवातीपासूनच या तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली. पावसाअभावी तालुक्यातील धानोरा,आसलगाव या भागात तंब्बल दोन ते तीन वेळा शेतकऱ्यांना पेरनी करावी लागली.त्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावं लागलं.तालुक्यातील नदी नाल्यांची परिस्थिती काही विशेस नसून ओस पडल्यागत त्यांची स्थिती झाली आहे.पावसाचे दोन महिने उलटुनही तालुक्यातील राजुरा,गोराळा लघुप्रकल्प पुर्णतः भरलेले नाही.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.त्यामुळे शेतकरी आनंदात असून शेतातील पिकांना जीवनदान मिळाले आहे.पाण्याअभावी या भागातील पिक सुकू लागली होती.त्यामुळे शेतकऱ्यांमधे चिंता वाढली होती पण गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण जिल्यासह जळगाव जामोद तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाच वातावरण पहावयास मिळाले.अजूनही तालुक्याल्या दमदार पावसाची गरज आहे.पण गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने शेतकरी राजा सुखावला असून शेतातील पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली एवढ मात्र खरं.
