Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर विधानसभेवर शिवसेनेचाभगवा फडकवणार

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी 

जामनेर विधानसभेवर शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनाच भगवा फडकवणार,येणारा काळ युवासेनेचाच आहे हे लक्षात घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सज्ज व्हा असे आदेश शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी युवासेनेच्या बैठकीत दिले.जामनेर येथे तालुका युवासेनेची बैठक शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याबैठकीत अनेक तरुणांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होत शिवसेना-युवासेनेत प्रवेश केला.

     वरिष्ठ पातळीवरुन जामनेरसाठी ग्रीन सिग्नल आहे फक्त तुम्ही कुस्ती लढण्यास तयार रहा असे मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा सांगितले,यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजित पाटील,शिवसेना शहर प्रमुख अतुल यांनी मनोगत व्यक्त केले,प्रास्ताविक युवा तालुका प्रमुख विशाल लामखेडे यांनी केले तर सुत्रसंचलन उपतालुका प्रमुख रोहन राठोड यांनी केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक सांडु गुरव,विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील,तालुका प्रवत्ता गणेश पांढरे,जामनेर दक्षिण शहर प्रमुख ज्ञानेश्वरजंजाळ,युवा तालुका समन्वयक कृष्णा गुरव,शेंदुर्णी युवा शहरप्रमुख अजय भोई, जामनेर युवा शहर समन्वयक अनिल चौधरी,ॲड.भरत पवार,दिपक माळी,सुरेश चव्हाण,कैलास माळी,विकास आहेर,मोहन जोशी,नागेश्वर पाटील,भुषण गरुड,गजानन पाटील यांच्यासह युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. यात पहूर येथील मुस्लिम समाजाचा तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यात पहूर येथील अमिन शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला त्यांची युवा सेना तालुका उपप्रमुख पदी निवड करण्यात आली