Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिव्यांग बांधवांना अंत्योदय राशन कार्ड मिळण्याबाबत तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

  प्रतिनिधी परतुर

           अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अराजकीय सामाजिक संघटना असूनमाननीय श्री शेख अनिस सर पत्रकार तथा अपंग नेते यांच्या कुशल नेतृत्वाखाली अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे पूर्ण महाराष्ट्रभर उल्लेखनीय कार्य सुरू आहे व अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दसपुते साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज दिनांक 2/7/2021 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व मित्र संघटना प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने आज परतुर तहसील कार्यालय येथे परतूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंतोदय रेशन कार्ड मिळणेबाबत निवेदन सादर करण्यात आले दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते परंतु या निवेदना ची अंमलबजावणी सन्माननीय तहसीलदार साहेब परतुर यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल सन्माननीय  तहसीलदार साहेबांनी घेतली नाही या अनुषंगाने आज पुन्हा अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना यांच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाची अंमलबजावणी येत्या 19 तारखेपर्यंत न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना यांच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आले हे निवेदन सादर करताना

    प्रवीण  ढवळे तालुका अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे माजी जिल्हाध्यक्ष हनुमान जी माने परतुर तालुका उपाध्यक्ष आसाराम सूर्यभान आबुज

परतुर तालुका सचिव आकाश वामन सोळंके परतुर तालुका सहसचिव श्याम अच्युत सोळंके अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सोयंजना शाखाध्यक्ष शिवकांत वशिष्ठ सोळंके माव पाटोदा शाखाध्यक्ष बालाजी दगडोबा पिसाळ व प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले सन्माननीय तहसीलदार साहेबांनी लवकरच या निवेदनाची दखल घेऊन परतूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंतोदय रेशन कार्ड वितरित करू असे आश्वासन अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना यांना दिले