प्रतिनिधि हिवरखेड : जितेश कारीया
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्र सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड 1193 अ मध्ये 2012 ला मान्यता मिळाली असून यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पदवी प्राप्त करून पुढील शिक्षणासाठी पात्र होतात . यामधील कितीतरी विद्यार्थी आज चांगल्या व उच्च पदावर कार्यरत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास केंद्रातर्फे सत्कार गौरव केला जाते.
यावर्षी सुद्धा आमच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय साहेबराव ढोकणे त्याने अमरावती विद्यापीठाच्या एम. एस. डब्ल्यू. या अभ्यासक्रमात विद्यापीठातून सातवा मेरिट तसेच अकोला जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला, त्यासाठी अभ्यास केला का रे त्याचा सत्कार व गौरव करण्यात आला. त्याचसोबत अभ्यास केंद्रामध्ये वयाच्या 45 व्या वर्षी प्रथम वर्षासाठी बीए मध्ये प्रवेश घेतलेल्या सौ. दीपिका देशमुख यांनी सूर्योदय महिला गृह उद्योग द्वारे 100 महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य करीत आहे. त्याच बरोबर त्यांनी आता बारामतीतील महिला बचत गटांना मार्गदर्शन करून विविध रोजगार बद्दल माहिती दिली त्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमारजी भोपळे, प्रमुख उपस्थिती मध्ये अभ्यास मंडळाचे अध्यक्ष श्यामशीलजी भोपळे, सत्कार मूर्ती अक्षय साहेबराव ढोकणे व सौ. दीपिकाताई देशमुख होते तर प्रमुख पाहुणे सौ . लिला ताई रंदे अध्यक्ष महिला बचत गट, प्रकाशजी राऊत माजी केंद्रप्रमुख, रेखाते ताई,केंद्रप्रमुख प्रा. रंजना अंजनकर, पर्यवेक्षिका प्रा. रजनी वालोकार, संस्थेचे संचालक स्नेहल भोपळे , केंद्र संयोजक प्रा. अभीजीत भोपळे,सतीशजी इंगळे ,अभिजीत ढोकणे ,गणेश खानझोडे ,प्रा निलेश गिऱ्हे ,प्रा कौस्तुभ भोपळे , तांत्रिक सहाय्यक प्रा सुनिल वाकोडे व केंद्र सहाय्यक प्रा .गणेश भोपळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. निखिल भड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.मयूर लहाने यांनी केले
