शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी लोणार
दि.14 जुलाई 2021रोजी लोणार सरोवर येथे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात लोणार तालुका व शहर काँग्रेसची सायकल रॅली काडण्यात आली.केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत, निषेध व्यक्त करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजेश मापारी, नितीन शिंदे,यांच्या नेतृत्वात शहरात सायकल रॅली बस स्टॅन्ड पासून सुरू हिरडव चौक, मार्गाने काढुन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारची पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांची अनावश्यक दरवाढी, गरीब मध्यमवर्गीय विरोधी आर्थिक धोरणे व सर्व जीवनावश्यक वस्तूंची वाढती महागाई ही देशासाठी गंभीर बाब आहे, मोदी सरकारने या महागाईला त्वरित आळा घालावा व जनतेची लूट बंद करावी. अशी मागनी कॉग्रेस पक्ष मार्फत करण्यात ये आहे.
ह्या सायकल रॅली मध्ये प्रामुख्याने नगर परिषद चे नगर सेवक तथा गट नेते भूषण मापारी, नगर उपाध्यक्ष बादशा खान, काँग्रेस नेते साहेबराव पाटोळे, नगरसेवक संतोष मापारी, आबेद भाई, रऊफ भाई, रमजान भाई, तोफिक सेट, सतीश राठोड, एन एस यु आय जिल्हा सरचिटणीस शेख जुनेद युवक काँग्रेस, तालुकाध्यक्ष भरत राठोड, ओम पाटोळे, शुभम चाटे ,अमोल सोनूने, अकीब कुरेशी, श्रेयश चव्हाण, विकास पवार, शेख फयूम, आसिफ चौधरी, आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सायकल रॅली ला उपस्थित होता.
