गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल - तालुक्यातील पळासदळ येथे आमदार चिमणराव आबा पाटील यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या पुतळ्याचा भुमिपुजन सोहळा पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी आ. पाटील यांच्यासमोर पाणी व घरकुल बाबतच्या समस्यां दुर करण्याची मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने आ. पाटलांनी पळासदळ गावाचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवेल तसेच गावाच्या हद्दवाडी बाबत त्वरीत माहीती मागवून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत घरकुल मिळणेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे ठोस आश्वसन ग्रामस्थांना दिले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, एरंडोल पंचायत समितीचे सभापती रोकडे सर, जळुचे माजी सरपंच रविभाऊ जाधव, मुंकुंदाभाऊ, मोरे साहेब, पळासदळे येथील मा.सरपंच विश्वनाथ मालचे, मा.ग्रा.पं.सदस्य सुनिल मालाचे, विद्यमान ग्रा.पं.सदस्य कैलास मालचे, तिरसिंग फुला मालचे, भैय्या मोरे, धनराज पवार,संजय पवार, सावता महाजन,आदी सर्व युवा शिवसैनिक, ग्रामस्थ तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
