Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामीण युवकांसाठी पशुसंवर्धनात रोजगारनिर्मितीच्या विपुल संधी – प्रा. डॉ. भिकाने

Responsive Ad Here

अकोला प्रतिनिधी पंकज शिरसाट

दि.२ कृषी दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात प्रतिपादन ग्रामीण युवकांनी दुधव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या शेतीपूरक जोडधंद्यांचा अवलंब केल्यास पशुसंवर्धनात दडलेल्या रोजगाराच्या संधी सहजगत्या उपलब्ध होतील असे मत प्रा. डॉ. अनिल भिकाने, मा. सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला यांनी मोरगाव भाकरे येथे कृषी दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमादरम्यान अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.


     महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे दत्तक ग्राम ‘मोरगाव भाकरे’ येथे “उन्नत भारत अभियान” आणि “अनुसूचित जाती विद्यार्थी व लाभार्थ्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र प्रकल्प” यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ जुलै २०२१ रोजी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचे जन्मदिनानिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधत पशुसंवर्धन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी, डॉ. प्रवीण बनकर, समन्वयक- कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सौ.शुभांगी भटकर,पं.स.सदस्य; सौ. उमाताई माळी, सरपंच; प्रा. डॉ. सुनील वाघमारे, पशुचिकित्सालय अधीक्षक; श्री. पांडुरंग भाकरे, ग्रा.प. सदस्य आणि श्री. बाबासाहेब वंजारे, मंदिर संस्थान अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. भिकाने यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश पंचभाई, समन्वयक –उन्नत भारत अभियान यांनी केले. प्रा. डॉ. भिकाने यांचे अध्यक्षतेखाली संपन्न सदर कार्यक्रमात “अनुसूचित जाती विद्यार्थी व लाभार्थ्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र प्रकल्प” अंतर्गत अनुसूचित जाती पशुपालकांना पशुवैद्यकीय औषधीसंचाचे वितरण करण्यात आले. तसेच  ग्राम वाचनालयासाठी “कृषी व पशुसंवर्धन संबंधी वाचनीय पुस्तकांचा संच” प्रा. डॉ. भिकाने यांचे हस्ते मा. सरपंच सौ. माळी यांना सदिच्छा भेट देण्यात आला. याप्रसंगी उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल श्री. आर एफ सय्यद, सेवानिवृत्त  पशुधन पर्यवेक्षक यांचा संस्थेतर्फे प्रा. डॉ. भिकाने आणि ग्रामस्थांतर्फे श्री गोपाळ भटकर यानी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सदर कार्यक्रमात श्री. मुकुंद सपकाळ, समन्वयक – पोकरा समिती यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात युवक वर्ग मोठ्या संख्येने कोविड नियमावलीचे पालन करत उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन, दत्तक ग्राम समन्वयक डॉ. मंगेश वडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. गोपाळ भटकर, श्री. प्रवीण भटकर, श्री. गजानन चोपडे, निवृत्ती जम्भिये आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.