Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

काँग्रेस व युवक काँग्रेस ची भव्य सायकल रॅली

Responsive Ad Here

राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगाव राजा

     महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचने नुसार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे आदेशाने बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज कायंदे यांच्या नेतृत्वात देऊळगाव राजा तालुका व शहर काँग्रेस सेवादल युवक काँग्रेस व विविध सेलच्या वतीने देऊळगाव राज्यात महागाईच्या निषेधार्थ भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

पेट्रोल डिझेल घरगुती गॅस खाद्यतेल आणि सर्व जीवनावश्य वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने  देऊळगाव राज्यात गीतांजली टॉकीज पासून चौंडेश्वरी मंदिर अहिंसा मार्ग महात्मा फुले रोड,जुनी नगरपरिषद, जुना जालना रोड, मदिना मार्केट बस स्थानक चौकापर्यंत काँग्रेसच्यावतीने महागाईच्या निषेधार्थ भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

     एकीकडे मानवनिर्मित कोरोना संकट, लॉकडाऊन, वाढती बेरोजगारी यांनी त्रस्त झालेले छोटे व मध्यम उद्योजक व्यापारी तसेच ऐन पेरणीच्या काळात वधारलेले बियाण्याचे,खत,औषधी चे भाव आणि पावसाचा अनियमितपणा अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी आणि सर्व स्तरातील नागरिक देशोधडीला लागले आहेत अशा बिकट परिस्थितीतही केंद्रात ठाण मांडून बसलेले खोटारडे आणि कुंभकर्णी झोपेत असलेले मोदी सरकारला भारतातील सर्वसामान्य जनतेची जराही काळजी वाटत नसल्यामुळे बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेस देऊळगाव राजा तालुका काँग्रेस शहर काँग्रेस सेवा दल व काँग्रेसच्या विवि सेलच्या वतीने महागाईच्या निषेधार्थ भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व जि प सदस्य मनोज कायंदे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा दिलीप सानप शहराध्यक्ष रफिक भाई कोषाध्यक्ष अतिश कासारे रमेश कायंदे सुभाष दराडे सर मल्लिकार्जुन लंगोटे सिद्धीक शेठ हनीफ शहा इस्माईल बागबान सरपंच गजानन काकड रामदास डोईफोडे राजेश बोराटे सरपंच विश्वनाथ घाडगे सुखदेव शिरसाट,राजू कांबळे, मुबारख भाई,नरेश कांबळे,रॅम पाटोळे, संतोष मुंडे,गणेश सरोदे सचिन मुंडे नाझीम भाई नासिर भाई सतीश झिने सुनील ताठे गजानन सांगळे गणेश मुंडे संतोष मुंडे विशाल गवई पुंजाराम नागरे रामदास सानप विलास नागरे सह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.